निवडणूक आयोगाची कमलनाथ यांना नोटीस

गोमंतक वृत्तसंस्था
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

भाजपच्‍या नेत्या इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ असा अपशब्द उच्चारल्याबद्दल 48 तासांच्या आत खुलासा करावा, अशी नोटीस निवडणूक आयोगाने बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांना बजावली.

 नवी दिल्ली : भाजपच्‍या नेत्या इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटेम’ असा अपशब्द उच्चारल्याबद्दल 48 तासांच्या आत खुलासा करावा अशी नोटीस निवडणूक आयोगाने बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांना बजावली. यामध्ये आयोगाने आचारसंहितेचा उल्लेख केला आहे.

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असून त्यानुसार कोणताही पक्ष सध्या अस्तित्वात असलेले मतभेद वाढतील असे कोणतेही कृत्य करणार नाही, द्वेषाचे वातावरण निर्माण करणार नाही, विविध जाती-जमातींमध्ये तेढ व तणाव निर्माण करणार नाही असे अपेक्षित आहे. रविवारी ग्वाल्हेरजवळील डबरा गावातील उमेदवार इमरती यांच्याबाबत कमल नाथ यांनी हे भाष्य केले होते. काँग्सचा रे उमेदवार साधी व्यक्ती आहे, तर इमरती या आयटेम आहेत, असे ते म्हणाले होते. याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगानेही कमल नाथ यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि कमल नाथ यांच्याविरुद्ध कोरोना निर्बंधांच्या उल्घनाबद्दल चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

संबंधित बातम्या