बेळगावात मराठीतून निवडणुकीचे अर्ज मिळेनात; मराठी भाषिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज कन्नडमधून दिले जात असल्याने मराठी भाषकांची अडचण होत आहे.

बेळगाव :  ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज कन्नडमधून दिले जात असल्याने मराठी भाषकांची अडचण होत आहे. निवडणुकीचे अर्ज मराठी भाषेतून मिळावेत, तो आमचा हक्‍क आहे. यासाठी आज सकाळी अकराला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय तालुका म. ए. समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच, निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच समितीचे तिकीट देण्याचे ठरले.

 

 

संबंधित बातम्या