कर्नाटकमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत एकाचा मृत्यू

हत्तीच्या सोंडेवर तसेच शरीरावर मोठ्या जखमा आढळून आल्या.
कर्नाटकमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत एकाचा मृत्यू
Elephant Dainik Gomantak

जोयडा: उत्तर कन्नडा जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील काळी वन्यजीव अभयारण्यात सोमवारी दोन नर हत्तींमध्ये झुंज झाली. यामध्ये जखमी झालेल्या एका हत्तीचा बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (elephant fight in Karnataka)

Elephant
Honeytrapमध्ये अडकला भारतीय हवाई दलाचा जवान, दिल्ली गुन्हे शाखेने केली अटक

मागील तीन वर्षातील ही दुसरी घटना आहे, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांच्या झुंजीत एक हत्ती गंभीर जखमी झाला. त्याच्या सोंडेवर तसेच शरीरावर मोठ्या जखमा आढळून आल्या. वन अधिकाऱ्यांनी जखमी हत्तीवर औषधोपचार केले.

मात्र, दोन दिवसात त्याचा मृत्यू झाला. मृत हत्तीवर वन अधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी एसीएफ शिवानंद तोडकर, कुळगी वन संरक्षण अधिकारी अभिषेक नाईक, रविकिरण व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.