हत्ती धडकणार सायकलीला

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

उत्तर प्रदेशात विधानपरिषद निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (बसप) समाजवादी पक्षाच्या पराभवासाठी प्रसंगी भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणाची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

नवी दिल्ली :  उत्तर प्रदेशात विधानपरिषद निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (बसप) समाजवादी पक्षाच्या पराभवासाठी प्रसंगी भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणाची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

काँग्रेसने मात्र या पाठिंब्यावरून बसपला चिमटा काढला आहे. यूपीतील राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार रामजी गौतम यांना पाठिंबा नाकारणाऱ्या सातही बंडखोर आमदारांना मायावती यांनी आज पक्षातून निलंबित केले.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीवेळी तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी पराभवानंतर संपुष्टात आली होती. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही पक्षांमधील मतभेद पुन्हा उफाळून आले आहेत. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आपल्या आमदारांना भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाला मतदान करण्याचे आदेश आज दिले.  मायावतींचे निकटवर्तीय सहकारी सतीशचंद्र मिश्रा आणि समाजवादी पक्षामध्ये झालेल्या वादावरूनही मायावती चिडल्या आहेत. 

संबंधित बातम्या