इंदिरा गांधींच्या काळात लावलेली आणीबाणी ही मोठी चूक; राहुल गांधींच मोठं विधान

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात आणिबाणी लावणं चूक होतं आणि ज्या काळात हे घडलं हे देखील चुकीचं होतं असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात आणिबाणी लावणं चूक होतं आणि ज्या काळात हे घडलं हे देखील चुकीचं होतं असं म्हटलं आहे. अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी एका  संवादादरम्यान राहुल गांधानी हे वक्तव्य केलं आहे. कॉंग्रेसद्वारा देशात आणिबाणी लावणं हे चूक होतं, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकटी आपल्या ताब्यात घेतल्या नाहीत. असं कॉंग्रेस नेते राहुल गांधीनी म्हटलं. ''मात्र आता सध्य़ा देशात जे काही सुरु आहे ते आणिबाणीपेक्षा वेगळं काही'', अशी टिकाही राहुल यांनी केली.

''मला वाटतं आणिबाणी ही एक चूक होती. नक्कीच ती मोठी चूक होती. मात्र आणिबाणीच्या काळात जे काही घडलं होतं त्यापेक्षा आताच्या काळात जे काही घडतं आहे. यात मोठा मूलभूत फरक आहे. कॉंग्रेसकडून देशातील घटनात्मक चौकटी कधीही स्वता:च्या हातात घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. तशाप्रकारची आपल्याला परवानगीदेखील नाही.''

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं कोण लिहितं? PMO ने दिली माहिती

1975 ते 1977 या काळात दिंवगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात 21 महिन्यांची आणिबाणी लावली होती.याआगोदरही कॉंग्रेस गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी एका मुलाखतीत देशात आणिबाणी लावणं ही चूक होती असं म्हटलं होतं. 24 जानेवारी  1978 रोजी महाराष्ट्रातील एका सभेदरम्यान आणिबाणीविषयी जाहीरपणे माफी मागितली होती.

 

''देशात स्वतंत्रपणे कार्य करणाऱ्या संस्थामध्ये संस्थात्मक समतोल राखला जात असल्यानेच आधुनिक काळात लोकशाही कार्य करते. मात्र आता भारतात त्य़ाच संस्थात्मक रचनेवरच हल्ला केला जात आहे. आरएसएस ही संस्था इतर संस्थामध्ये हस्तक्षेप करत आहे. हल्ला केला जात नाही अशी एकही संस्था नाही हे अत्यंत पध्दतशीरणे सुरु आहे,'' अशी टिका राहुल यांनी केली.

''न्यायव्य़वस्था, प्रेस, प्रशासकीय संस्था, निवडणूक आयोग... या संस्थामध्ये पध्दतशीरपणे एका विशिष्ट विचारसणीच्या लोकांची संस्थामध्ये भरली जात आहेत,'' असंही राहुल गांधी म्हणाले.

 

संबंधित बातम्या