Emergency landing: एअर इंडियाच्या विमानातून वटवाघूळाची हवाई सफर

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 मे 2021

दिल्ली(Delhi) वरून अमेरीका(America) जाणाऱ्या एअर इंडिया(Air India) फ्लाइटला अचानक इमरजंन्सी लॅंन्डींग(Emergency landing) करावी लागली. शुक्रवारी पहाटे 2.20 मिनिटांनी एअर इंडियाचे एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक एआय -154 ने दिल्लीहून नेवार्क AI-105 (Delhi-Newark) कडे जाण्यास उड्डाण केले.

नवी दिल्ली: दिल्ली(Delhi) वरून अमेरीका(America) जाणाऱ्या एअर इंडिया(Air India) फ्लाइटला अचानक इमरजंन्सी लॅंन्डींग(Emergency landing) करावी लागली. शुक्रवारी पहाटे 2.20 मिनिटांनी एअर इंडियाचे एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक एआय -154 ने दिल्लीहून नेवार्क AI-105 (Delhi-Newark) कडे जाण्यास उड्डाण केले. टेक-ऑफनंतर सुमारे 30 मिनिटांनंतर प्रवाशांच्या क्षेत्रात वटवाघूळ दिसले. आणि त्यानंतर विमान दिल्लीला परत आले, विमानाची आपत्कालीन लँडिंग पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विमानात मरून पडलेल्या वटवाघूळाला बाहेर काढले.(Emergency landing Air India flight to Newark return back to Delhi after bat flew by cabin)

एअर इंडियाच्या बोईंग 777-ईआर विमानाचा वापर दिल्ली ते नेवार्क दरम्यान उड्डाण सेवांसाठी केला जातो. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दिल्ली-एडब्ल्यूआरआय एआय -105 विमानासाठी दिल्ली विमानतळावर स्थानिक स्टँडबाय लॅंडींग जाहीर करण्यात आली. विमानाच्या लँडिंगच्या वेळी क्रूने केबिनमधील वटवाघूळाविषयी माहिती दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी चुकवलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव 

वन्यजीव तज्ज्ञांनी वटवाघूळाला बाहेर काढले
शुक्रवारी उड्डाणानंतर सुमारे अर्धा तासानंतर वैमानिकाने विमानातील वटवाघूळाविषयी हवाई वाहतूक नियंत्रणास माहिती दिली. त्यानंतर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करून विमान परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानतळावरील कर्मचार्‍यांनी लँडिंगनंतर विमानाचा शोध घेतला असता त्यात वटवाघूळ कोठेही सापडले नाहीत. यानंतर वन्यजीव तज्ञांना बोलविण्यात आले. त्यांनी विमानाला फ्युमिगेट केले, त्यानंतर वटवाघूळ सापडले, मात्र तोवर ते मरण पावले होते.

बांग्लादेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडिओवरुन पाच नराधम गजाआड

डीजीसीएने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरी उड्डाण महासंचालक (डीजीसीए) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “एअर इंडियाचे बी 777-300ER विमान दिल्ली-नेवार्क दरम्यानच्या सेवेसाठी वापरले जाते. त्याचा नोंदणी क्रमांक व्हीटी-एएलएम आहे. 'या प्रकरणात ग्राऊंड सर्व्हिस कर्मचार्‍यांचे दुर्लक्षही उघडकीस आले आहे, कारण प्रत्येक उड्डाणांपूर्वी विमानाची कसून तपासणी केली जाते. जेव्हा सर्व काही ठिक असते तेव्हाच त्या फ्लाइटला क्लेरेन्स मिळतो.
 

संबंधित बातम्या