मेक इन इंडीयाला उभारी देण्यासाठी देशात दारुगोळा तयार करण्यावर देणार भर 

दैनिक गोमंतक
बुधवार, 24 मार्च 2021

'स्वदेशीकरणाची सकारात्मक यादी' म्हणून ओळखली जाणारी ही यादी या महिन्याच्या अखेरीस सैन्याच्या व्यवहार विभागाकडून जनरल बिपिन रावत(Gen Bipin Rawat) यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

'मेक इन इंडियाला'(Make in India ) उभारी देण्यासाठी संरक्षण-संबंधित ज्या 101 वस्तूंच्या आयातीवर बंदी आणण्यात आलेली होती, त्या यादीत आता सैन्यातील महत्वाच्या शस्त्रांसाठी आवश्यक असणारा दारूगोळा तसेच विमानाच्या भागांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. 'स्वदेशीकरणाची सकारात्मक यादी' म्हणून ओळखली जाणारी ही यादी या महिन्याच्या अखेरीस सैन्याच्या व्यवहार विभागाकडून जनरल बिपिन रावत(Gen Bipin Rawat) यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या स्थानिक उद्योजकांशी मुख्यतः खासगी उद्योजकांशी चर्चा करणार आहोत. योग्य वेळ आल्यावर सर्व प्रकारच्या दारूगोळ्याच्या आयातीवर बंदी घालण्यावर आपले लक्ष असेल, कारण हा आपल्या संरक्षण सज्जतेचा सर्वात महत्वाचा भाग आहे असे सैन्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलॆ.(Emphasis will be laid on manufacturing ammunition in the country to boost Make in India)

मागच्या काही काळात पाकिस्तान आणि चीन सोबत झालेल्या काही घटनांमध्ये आपल्याला पाश्चिमात्य देशांकडून दारुगोळा आयात करावा लागला होता. त्यामुळे हा दारुगोळा जर आपणच निर्माण करू शकलो तर देशाच्या बाहेर जाणारा पैसा देशातच राहील आणि देशाला आर्थिक फायदा होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या अनुशंघाने डिपार्टमेन्ट ऑफ मिलिटरी अफेअर देशातील काही उद्योजकांशी चर्चा करत आहे. सैन्याला आवश्यक असणारा शस्त्र, दारुगोळा ते किती दिवसात तयार करू शकतील, याची माहिती देखील या उद्योजकांना मागवण्यात आल्याचे समजते आहे.  

दरम्यान, अशी पहिली यादी मागील वर्षी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार सैन्यात वापरल्या जाणाऱ्या परदेशी तोफा आणि पाणबुड्यांची आयात थांबविली गेली आहे. तर आवश्यकता भासल्यास त्यात परदेशी भागीदारी मदत घेतली जाणारा आहे. यामुळे भारतीय लष्कराला इस्त्राईलकडून तोफा, बंदूका खरेदी करण्याचा संभाव्य करार रोखला गेला आणि आता डीआरडीओने(DRDO)  विकसित केलेल्या टाटा-कल्याणी संयोजनाद्वारे तयार केलेल्या एटीएजीएस  नावाच्या देशी प्रणालीच्या तोफा आणि बंदुका निर्माण केल्या जात आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व प्रकारच्या दारूगोळ्याच्या आयातीवर बंदी घालण्यावर आपले लक्ष असेल, कारण हा आपल्या संरक्षण सज्जतेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर दारुगोळा देशामध्ये तयार झाला तर आपत्कालीन परिस्थितीतही आपण आपल्या गरजा भागवू शकू असा सैन्याचा उद्देश आहे. 
  सिंधू करारावर चर्चा करण्यासाठी भारत-पाकिस्तान आमनेसामने; वाचा सविस्तर

 

संबंधित बातम्या