पीडिता आणि आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये होते २३ वर्षांपूर्वीचे वैर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

जमिनीच्या वादातून ठाकूरांचे दोन गटात विभाजन झाले होते. तेव्हापासून अनेकदा या दोन्ही गटात तणाव झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 23 वर्षांपूर्वी पीडितेच्या वडिलांनी आरोपींचे वडील आणि त्याच्या भावाविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार केली होती.

हाथरस-  उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये झालेल्या अत्याचारामुळे देशभर संताप व्यक्त केला जात आहे. येथील गावकऱ्यांनी दिलेली माहिती आणि गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार अत्याचार झालेल्या पीडितेच्या कुटुंबामध्ये आणि आरोपीच्या परिवारात मागील 23 वर्षांपासून वैर असल्याचे सांगितले जात आहे.

याआधी पीडितेच्या वडीलांनी आरोपी संदीपच्या वडीलांविरुध्द एससी/ एसटी अॅक्टखाली मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. बुलघडी गाव हे ठाकूरबहूल असून पीडिता ज्या वाल्मिकी समाजातील होती, तो समाज गावात संख्येने अल्प आहे. या गावात ठाकुरांमध्येही दोन गट आहेत. त्यातील एक गटासोबत वाल्मीकी समाज आहे. तर दुसऱ्या गटात आरोपी असलेले संदीप, रामू, लवकूश आणि रवी यांचा सामावेश आहे.

ठाकूरांचे दोन गट-

तीन आरोपी एकाच गटातील असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एक आरोपी रामुच्या काकांचा मुलगा रवी आहे. तसेच रामू आणि संदीप नातेवाईक आहेत. हे सर्वजण पीडितेच्या शेजारचे आहेत. दोन्ही ठाकूर गटात एका जमिनीवरील मालकी हक्कांवरून वाद असल्याचे सांगितले जात आहे. 

23 वर्षांआधी केली होती तक्रार -

जमिनीच्या वादातून ठाकूरांचे दोन गटात विभाजन झाले होते. तेव्हापासून अनेकदा या दोन्ही गटात तणाव झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 23 वर्षांपूर्वी पीडितेच्या वडिलांनी आरोपींचे वडील आणि त्याच्या भावाविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार केली होती. पण नंतर दोन्ही गटातील वाद मिटला होता.

14 सप्टेंबरला झाला अत्याचार-

हाथरसमधील चंदपा पोलिस ठाणे क्षेत्रातील भागात 14 सप्टेंबरला चार तरुणांनी 19 वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार केला होता. यावर पोलिसांनी केलेल्या तपासावर मोठी टीका झाली होती. आरोपींवर सुरुवातीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक न करता विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली होती. 

संबंधित बातम्या