सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी उद्यम नोंदणी पोर्टल आजपासून कार्यरत

pib
गुरुवार, 2 जुलै 2020

पोर्टल वगळता इतर कोणतीही खासगी ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रणाली, सेवा, एजन्सी किंवा व्यक्ती एमएसएमई नोंदणी करण्यास अधिकृत नाही असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबई,

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने विकसित केलेले उद्यम नोंदणी पोर्टल आजपासून कार्यरत झाले आहे. 26 जून 2020 रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार उपक्रमांची/उद्योगांची वर्गवारी व नोंदणीची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी https://udyamregmission.gov.in पोर्टल सुरू करण्याबरोबरच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने सुलभिकरणासाठी चॅम्पियन्स नियंत्रण कक्ष व डीआयसी येथे एकल खिडकी प्रणाली स्थापन केली आहे.

नवीन नोंदणी प्रक्रियेमुळे ‘व्यवसाय सुलभिकरणा’ ला प्रोत्साहन मिळेल आणि व्यवहारासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी होईल अशी आशाही मंत्रालयाने व्यक्त केली आहे. 

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने देखील यासंदर्भात खालील ट्विट केल्या आहेत:

1.https://twitter.com/msmechampions/status/1278287766963408899?s=09

 

2. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने (@minmsme) ट्विट केले आहे:

अभिनंदन! एमएसएमईची नवीन वर्गीकरण व नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. आपण आपला उपक्रम किंवा उद्यम https://t.co/oQgGOarGos वर नोंदवू शकता. कृपया नि:संकोचपणे सूचना करा.

@msmechampions @PMOIndia

https://t.co/cjOZ39nara https://t.co/pqd51R3jOL

https://twitter.com/minmsme/status/1278287967686098945?s=20

 3. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने (@minmsme) ट्विट केले आहे:

एमएसएमईच्या नोंदणीसाठी एमएसएमई मंत्रालयातर्फे आज एक सर्वसमावेशक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. एनआयसीच्या मदतीने https://t.co/oQgGOarGos या नावाचे पोर्टल संपूर्णपणे देशांतर्गत तयार केले आहे.

@msmechampions https://t.co/hziUgWEYcQ

https://twitter.com/minmsme/status/1278299818696327172?s=20

संबंधित बातम्या