हिमालय रक्षक सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

Environmentalist Sunderlal Bahuguna passed away
Environmentalist Sunderlal Bahuguna passed away

चिपको चळवळीतील नेते आणि जगप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी(Environmentalist) सुंदरलाल बहुगुणा(Sunderlal Bahuguna) यांचे आज निधन झाले. पर्यावरणवादी बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर ऋषिकेश एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, शेवटी त्यांनी आज दुपारी वयाच्या 95 व्या वर्षी  रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Environmentalist Sunderlal Bahuguna passed away)

पर्यावरणवादी बहुगुणा यांच्या निधनाची वार्ता समजताच देशभर शोककळा पसरली. पंतप्रधान, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि इतरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन हे आपल्या देशासाठीचे मोठे नुकसान आहे. निसर्गाशी सुसंगत राहण्याची शतकानुशतक परंपरा त्यांनी कायम ठेवली. देश त्याचा साधेपणा आणि करुण भावना कधीही विसरणार नाही. 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जगात वृक्षमित्र म्हणून ओळखल्या जाणारे, चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा, महान पर्यावरणविज्ञानाच्या निधनाची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली, असे त्यांनी ट्विटवर लिहिले. ही बातमी ऐकून मन खूप दु: खी झाले आहे.  फक्त उत्तराखंडच नाही तर संपूर्ण देशाचे न भरून येणारे नुकसान आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांना आदरांजली वाहिली. शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटरवर लिहिले- 'पद्मविभूषण श्री सुंदरलाल बहुगुणा, पर्यावरणीय चैतन्याचे प्रणेते यांचे वृत्त ऐकून वाईट वाटले. मी शोक व्यक्त करतो, त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी हिच प्रार्थना.

बहुगुणा चिपको चळवळीचे नेते होते
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करणारे सुंदरलाल बहुगुणा यांनी 70 च्या दशकात पर्यावरण संरक्षणाची मोहीम सुरू केली, त्या दरम्यान चिपको आंदोलन देखील सुरू केले गेले. उत्तराखंडच्या गढवाल हिमालयामध्ये वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली, मात्र १९७४ मध्ये बहुगुणांच्या नेतृत्वात, या संकटाचा निषेध शांततेत सुरू झाला. या निषेधात स्थानिक महिला झाडांना चिकटून झाडांचे संरक्षण करत होत्या त्यांमुळए संपूर्ण जग या आंदोलनाता चिपको आंदोलन म्हणून ओळखू लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com