‘ईपीएफओ’वर दोन हप्त्यांत व्याज मिळणार

पीटीआय
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) २०१९-२०२०साठी ८.५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय आज जाहीर केला.

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) २०१९-२०२०साठी ८.५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय आज जाहीर केला. मात्र हे व्याज दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. आता ८.१५ टक्के व्याज देण्यात येईल, तर उर्वरित ०.३५ टक्के व्याज डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहे.  यावर्षी मार्चमध्ये ईपीएफओने भविष्य निर्वाह निधीवर यावर्षी ८.५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

आज झालेल्या व्हर्चुअल बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय आपल्या डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमच्या अंतर्गत पेआऊटची मर्यादा सहा लाखांवरून सात लाख करण्यात आली. तसेच ग्राहकांसाठी एक वेगळी निवृत्तिवेतन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव प्रतिनिधींच्या विरोधामुळे बारगळला. या प्रस्तावावर आता डिसेंबरमध्ये फेरविचार करण्यात येण्याची शक्यता आहे. ईपीएफओने यापूर्वी ईटीएफमधील गुंतवणुकीचा हिस्सा विकण्याची योजना आखली होती. 

संबंधित बातम्या