दांडेली येथे जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण

Dainik Gomantak
गुरुवार, 11 जून 2020

लोकांनी घाबरून जावू नये, कोविड-१९ या महामारी रोग लवकरच नियंत्रणात येईल

हल्याळ

कोविड-१९ च्या संकटकाळात कारवार जिल्हा विधान परिषद सदस्य एस.एल. घोटणेकर यांनी हल्याळ-जोयडा दांडेली- रामनगर विधानसभा मतदार संघात गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांनी सेवा केलेली ही जनतेच्या मनात अविस्मरणीय राहील अशी कृतज्ञता तेथील नागरिकांनी व्‍यक्त केली आहे.
हल्याळ-जोयडा-मतदारसंघातील जनतेने त्यांच्‍या कार्याचे अभिनंदन केले आहे. दांडेली येथील डिलक्स मैदानावर दांडेलीतील वेस्ट कास्ट पेपर मील येथील रोजंदारीवरील कामगारांना व ब्युट्यशियनना व सुरक्षारक्षकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. सुमारे ८०० मदतरुपी जीवनावश्‍‍यक साहित्‍यांचे त्‍यांनी वितरण केले. लोकांनी घाबरून जावू नये, कोविड-१९ या महामारी रोग लवकरच नियंत्रणात येईल, असे आवाहन त्‍यांनी केले. यावेळी त्‍यांनी जनजागृती करताना मास्क वापरा आणि सामाजिक अंतर ठेवा, असेही सांगितले.
यावेळी व्यासपीठावर हल्याळ कृषी बाजार समितीचे अध्यक्ष काँग्रेसचे युवा नेते श्रीनिवास घोटणेकर, दांडेली येथील मजदूर संघाचे पदाधिकारी सर्जित सिंग रुपेश पवार, मंजूनाथ सुकद, करन सिंग, देवानंद सडेकर, श्रीकांत गावस, रुपेश सावंत, एन. एच. पाटील व इतर मान्‍यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या