तामिळनाडूत कोरोना देवीची केली स्थापना

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

तामिळनाडूच्या कोयंबतूरमधुन (Coimbatore) देखील अशीच चर्चा समोर आली आहे. येथील इरुगूरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिरान कोरोना देवीची (Corona Devi)  मूर्ती बनवली आहे.  

चेन्नई: माहामारीमुळे देशात चिंतेत वातावरण निर्माण आहे. अनेक राज्यात लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले आहे. अशा माहामारीपासून बचावकरण्यासाठी नियमांच पालन करणे आणि लसीकरण हे दोन महत्वाचे उपाय मानले जात आहे. एकीकडे डॉक्टरस् कोरोना विषणूला (Corona virus) रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. परंतु दुसरीकडे काहीजण श्रधेच्या मार्गाने कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागांतून कोरोना देवीच्या पूजेची चर्चा सुरू झाली आहे. तामिळनाडूच्या कोयंबतूरमधुन (Coimbatore) देखील अशीच चर्चा समोर आली आहे. येथील इरुगूरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिरान कोरोना देवीची (Corona Devi)  मूर्ती बनवली आहे.  (Establishment of Goddess Corona in Tamil Nadu)

 

 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना घाबरतात का ?"

देवीची पुजा करण्याचा निर्णय मंदिराने घेतला आहे. यामुळे लोकांचा कोरोना विषाणूपासून बचाव होणार असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. पूर्वी कॉलरा आणि प्लेग यासारख्या आजारांपासून बरे होण्यासाठी देवीची पुजा केली जात होती. लोकाना यासारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी ही परंपरा आहे. याआधी प्लेगसोबतच अनेक इतर देव-देवतांच्या मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. असे आदिनाम मंदिरातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली.      

 राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोविड 19 ने निधन       

तमिनाडूच्या आरोग्य विभागानुसार, 34,875 नवीन कोरोना रुग्ण समोर आले  आहेत. राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या वाढून 16,99,225 आली आहे. तसेच 365 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील मृतांची संख्या 18,734 वर पोहोचली आहे. मेडिकलच्या  माहितीनुसार, बुधवारी 23,863 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर आतापर्यंत एकूण 14,26,915 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2,53,576 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

 

 

संबंधित बातम्या