युरोपीय युनियनचे प्रतिनिधी जम्मू काश्मीरमध्ये दाखल

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

मोदी सरकारकडून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम 2019 मध्ये हटवण्यात आले होते.

श्रीनगर : मोदी सरकारकडून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम 2019 मध्ये हटवण्यात आले. यामुळे जम्मू काश्मिरमधील राजकिय वातावरण चांगलंच तापलं होतं. यानंतर या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपीय संघाचे प्रतिनिधी दोन दिवसांच्या दौऱ्य़ासाठी आज जम्मू काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. केंद्र सरकारकडून 370 कलम 5 ऑगस्ट 2019 मध्ये हटवून जम्मू काश्मीरचे विभाजन केले. यातून दोन केंद्रशासीत प्रदेशांची नव्याने स्थापना करण्यात आली. एक जम्मू काश्मीर हा संयुक्त आणि दुसरा  लडाख केंद्रशासीत प्रदेश तयार करण्यात आला. 370 कलम हटवल्यानंतर युरोपीयन संघाचे जम्मू काश्मीरला भेट देणारे हे तिसरे परराष्ट्रीय मंडळ आहे.

शेतकरी आंदोलनाला उतरती कळा, का शेतकऱ्यांची नवी रणनिती ?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपीयन संघाचे 20 सदस्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी भेट देणार आहे. यासाठी काश्मीर खोऱ्यासंह इतर प्रदेशातही शांतता राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, श्रीनगरमध्ये सैनिक कमी दिसावेत यासाठी काही कामगारांनी मंगळवारी श्रीनगर विमानतळाला जोडणाऱ्या शहरा लगतच्या मुख्य रस्त्यावरील सुरक्षा बंकरला क्षती पोहचवली आहे. 
 

संबंधित बातम्या