Karnataka Government : मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेना; शिवकुमारांचा ‘हट्ट’योग तर सिद्धरामय्यांचेही दिल्लीत ठाण

आता निर्णय सोनिया गांधीकडे
Karnataka Government
Karnataka GovernmentDainik Gomantak

Karnataka Government Next CM: कर्नाटकच्‍या मुख्‍यमंत्रिपदी सिद्धरामय्या यांची वर्णी लावण्‍याचे काँग्रेस हायकमांडने नक्‍की केले आहे; परंतु कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमारही मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी राहुल गांधींनी दोन वेळा भेट घेतली आहे.

मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. शिवकुमार यांनी त्यांच्या समर्थकांना दिल्लीला बोलावून घेतले आहे. आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे कर्नाटक नेतृत्वाचा निर्णय जाण्याची शक्यता आहे.

मागील शनिवारी काँग्रेस पक्षाला ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही राज्याला मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गत दोन दिवसांत सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केली.

यानंतर खर्गे यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतरही मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. राहुल गांधींनी आज शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांशीही चर्चा केली.

मात्र, अद्याप निर्णय झाला नसल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सांगितले. विद्यमान विधानसभेची मुदत येत्या २४ मे रोजी संपणार आहे. यामुळे त्यापूर्वी नवे सरकार अस्तित्वात येण्याची घटनात्मक गरज आहे.

Karnataka Government
Nirajsingh Rathod: भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे मंत्रीपदासाठी पैसे मागणाऱ्या गुजरातच्या भामट्यास अटक

अफवांवर विश्वास ठेवू नये : सुरजेवाला

कर्नाटकच्या नेतृत्वाचा तिढा सोडविण्यास काँग्रेसला उशीर होत असल्याने अनेक चुकीच्या बातम्या प्रसारित होत असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. सिद्धरामय्या यांची निवड झाल्याचे वृत्त बुधवारी दुपारी पसरले होते.

त्यानंतर कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांना पत्रकार परिषदेत स्पष्ट करावे लागले.

आतापर्यंत काय घडले? आनंद, ठराव, मतभेद आणि मोठा पेच

१३ मे : विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने दमदार विजय मिळवत १३५ जागांवर पूर्ण बहुमत मिळवले.

१४ मे : काँग्रेस विधिमंडळाच्या बंगळुरू येथील बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार हे खर्गे ठरवतील, असा ठराव मंजूर झाला.

१५ मे : निरीक्षकांनी दिल्ली गाठून अहवाल खर्गे यांच्याकडे सोपवला. सिद्धरामय्या दिल्लीला पोहोचले; पण शिवकुमार आले नाहीत.

१६ मे : खर्गे यांच्या घरी राहुल गांधींची भेट. शिवकुमार यांनी दिल्लीत येऊन खर्गे यांची भेट घेतली. यानंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची खर्गे यांच्यासोबत बैठक झाली.

१७ मे : पाचव्या दिवशीही खलबते सुरूच होती. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी कर्नाटकच्या सत्तासंघर्षावर चर्चा झाली. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी राहुल गांधींची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला नाही.

Karnataka Government
GCET Result 2023 : अदीप, अथर्व, हेमांशिनी ‘जीसीईटी’मध्‍ये अव्‍वल

तडजोडीस डीकेंचा नकार

डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री, कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि दोन मंत्रालये दिली जातील, असे सांगितले जात होते. हायकमांडला सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे.

त्यांनी डीकेंसमोर तीन सूत्र ठेवली होती. मात्र, ते कशावरही राजी नसल्याचे समजते आहे. आपण लोकसभेच्या २० ते २२ जागा जिंकवू शकतो, असे डी. के. यांनी हायकमांडला सांगितले आहे.

आजचा दिवस महत्त्वाचा

शिवकुमारही मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. शिवकुमार यांनी आता त्यांच्या समर्थकांना दिल्लीला बोलावून घेतले आहे. बंगळुरूला फोन करून समर्थकांना गुरुवारच्या पहिल्या विमानाने दिल्लीला बोलावण्यात आले आहे.

जर जास्त संख्येने समर्थक दिल्लीला आले तर गुरुवारचा दिवस काँग्रेससाठी गदारोळाचा ठरू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com