कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरी आता तुम्हाला उपचार घेता येणार

दैनिक गोमंतक
शनिवार, 8 मे 2021

नव्या नियमांनुसार आता कोरोना उपचार घेण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे असणार नाही.

देशात कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेत (Second Wave) अनेक नव्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळते आहे. कोरोना संक्रमणाचे आकडे रोज नवा विक्रम गाठत असल्याचे पाहायला मिळते आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते आहे. याच अनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) काही नियम बदलल्याचे पाहायला मिळते आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या राष्ट्रीय नितीमध्ये बदल केला असल्याचे समजते आहे. नव्या नियमांनुसार आता कोरोना उपचार घेण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्ह (Corona Positive) रिपोर्ट असणे गरजेचे असणार नाही. (Even if the corona test is negative, you can now get treatment)

‘लोकांचा जीव जातोय...’; राहुल गांधीचा पंतप्रधान मोदींवर निशाणा 

आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयात दाखल होण्यासाठी तयार केलेल्या नियमांमध्ये काही सुधारणा केल्या असल्याचे समजते आहे. त्याच बरोबर राज्यांना देखील कोरोनाचा संशय असलेल्या रुग्णांना देखील भरती करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोणत्याच रुग्णाला ऑक्सिजन आणि औषधींसाठी रुग्णालयाला नकार देता येणार नाहीये. तसेच इतर जिल्ह्यातील रुग्णांना देखील रुग्णालयांना रुग्णालयात भरती करून घ्यावे लागणार आहे.

 

कोणत्याही रुग्णाला जर उपचारांची गरज असेल तर कुठल्याही अटी शर्थी न ठेवता आरोग्य मंत्रालयाने त्या रुग्णाला आवश्यक असलेले उपचार केले पाहिजेत. उपचारांची आवश्यकता नसलेल्या लोकांनी जर बेड व्यस्त करून ठेवले असतील तर त्यावर सुद्धा रुग्णालय प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना तीन दिवसांच्या आत या सर्व निर्देशांचा समावेश असलेले परिपत्रक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या