बिहार निवडणूक मतदानादरम्यान निमलष्करी दलाच्या जवानांवर मतदारांचा हल्ला

बिहार निवडणूक मतदानादरम्यान निमलष्करी दलाच्या जवानांवर मतदारांचा हल्ला
events of violence registered during the third phase voting of Bihar elections

पाटणा :  बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यासाठी शनिवारी मतदान झाले. राज्यातील १५ जिल्ह्यातील ७८ जागांसाठी विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार चौधरी व ११ मंत्र्यांसह एकूण एक हजार २०४ उमेदवार रिंगणात होते. या मतदानादरम्यान तुरळक हिंसाचार झाला. 

पूर्णियातील एका मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करणाऱ्या निमलष्करी दलाच्या जवानांशी वादावादी झाल्यावर मतदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर जवानांनी हवेत गोळीबार केल्याने धावपळ उडाली. कटिहारमधील मतदान केंद्रावरही गर्दीवर नियंत्रण ठेवताना सुरक्षा जवानांनी बळाचा वापर केला. त्यात दोन मतदार जखमी झाले. 

नितीश कुमारांना निवृत्त करा : राऊत
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या निवडणुकीत जनता निवृत्त करेल,’ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली. जर एखादा नेता म्हणत असेल की माझी शेवटची निवडणूक आहे,  
तर त्याला सन्मानाने निरोप द्यायला हवा. बिहारची जनता या निरोपाच्या प्रतीक्षेत होती ’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

  • सुपौल, मोतीहारी, दरभंगा और कटिहार आदी जिल्ह्यांत काही गावांमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार.
  • कोरोनाबाधित अपक्ष उमेदवार नीरज झा यांचे निधन झाले. ते मधुबनीमधील बेनीपट्टी येथून लढत होते.
  • पंतप्रधान मोदी, तेजस्वी यांच्यासह अन्य नेत्यांचे मतदानासाठी आवाहन.
  • दरभंगामधील सिरनिया गावात मतदानासाठी अस्थायी पुलाची निर्मिती.
  • पूर्णिया जिल्ह्यात गुंड बिट्टूसिंह याचे भाऊ बेनीसिंह याची हत्या. मतदानाला जाताना त्याच्यावर गोळीबार.
No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com