‘सर्वांनी देशाच्या एकतेची शपथ घ्यावी’

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

अर्थसंकल्पाचा वापर वोट बॅंक निर्माण करणारी हिशोबाची वही म्हणून करण्यात आला.

नवी दिल्ली: देशात कृषी कायद्यावरुन शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ''देशातील नागरिकांना देशाच्या एकतेला प्राधान्य देण्याची शपथ घ्यावी'' असं आवाहन चौरीचौरा शताब्दी महोत्सवानिमीत्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना केले. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी टपाल तिकीटाचे उद्घाटन सुध्दा करण्यात आले आहे.

पंतप्रधान म्हणाले, ''देशातील नागरिकांनी देशाच्या एकतेला प्राधान्य देण्याची शपथ घ्यायला हवी त्याचबरोबर याचा सर्वांच्यावर सन्मान व्हावा. याच भावनेने आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने पुढे गेले पाहिजे. देशाच्या समोर कोरोना काळात खूप मोठी आव्हाने होती, मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. गेल्या अनेक दशकापासून आपल्या देशात अर्थसंकल्पाचा अर्थ फक्त कोणाच्या तरी नावाने घोषणा करण्य़ापुरता इतका राहीला होता. अर्थसंकल्पाचा वापर वोट बॅंक निर्माण करणारी हिशोबाची वही म्हणून करण्यात आला.

Farmer protest: गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकरी आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना लक्षात घेत मोदी म्हणाले, ''जर देशातील शेतकरी अधिक प्रभावी पध्दतीने सशक्त झाला तर आपोआपच कृषी क्षेत्रातील प्रगती होईल आणि कृषी क्षेत्राला उभारी मिळेल. यासाठी अर्थसंकल्पात अनेक नव नवी पावली उचलण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी 1000 नव्या बाजारांना ई- नामशी जोडण्यात येणार आहे.’’ कृषी कायद्यावरुन केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या मात्र अद्याप या कायद्यांवर तोडगा निघू शकलेला नाही.   

संबंधित बातम्या