लसीकरण कसे होईल? 

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

कोरोनाच्या लसीकरणासाठी सरकार सध्या विविध संस्थांशी चर्चा करत आहे. त्याच्या ट्रॅकिंगची कार्यपद्धतीही निश्‍चित करत आहे.

डॉ. शाळिग्राम :  कोरोनाच्या लसीकरणासाठी सरकार सध्या विविध संस्थांशी चर्चा करत आहे. त्याच्या ट्रॅकिंगची कार्यपद्धतीही निश्‍चित करत आहे. मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशनद्वारे ऑटोमाईझ पद्धतीने लसीकरण करावे, म्हणजे लसीकरणावर नियंत्रण आणि समन्वय ठेवणे शक्‍य होईल. तसेच, लसीकरणाचा प्राधान्यक्रमही ठरविण्यात येत आहे. त्यासाठी आवश्‍यक तेवढ्या लशी पुरविण्यासाठी आम्हीही क्षमता वाढविली आहे. 

कोरोनावरील लशीवर काम केव्हा सुरू केले? 

कोरोनाने जागतिक साथीचे रूप घेतले असून, त्याला रोखण्यासाठी तातडीने लसीवर काम करावे लागणार हे आमच्या फेब्रुवारी महिन्यातच लक्षात आले. ‘सीरम’चे संस्थापक डॉ. सायरस पुनावाला व मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि जोखीम पत्करायच्या तयारीने आम्ही आजवरचे यश प्राप्त केले झाले. लॉकडाउनच्या प्रतिकूल परिस्थितीतही लशीच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आम्ही उभारल्या. त्यादृष्टीने आम्ही स्वतः संशोधन केले, त्याचबरोबर जगातील नवीनतम संशोधनावर आम्ही लक्ष ठेवून होतो. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाबरोबर ‘सीरम’चे अनेक वर्षांपासून संबंध असून, ‘कोविशिल्ड लशीच्या अगदी सुरवातीच्या काळातच आम्ही संशोधन आणि उत्पादनाला सुरवात केली. कमी वेळेत महाकाय सुविधा उभ्या करण्याचे शिवधनुष्य पेलण्यात सीरम इन्स्टिट्यूट यशस्वी ठरली आहे. 

सीरमने कोरोना काळात नक्की काय काम केले? 
‘कोविशिल्ड’ लशीबरोबरच सीरमने जगात सर्वांत प्रथम इम्युनो बूस्टर असलेल्या ‘व्हीपीएम१००२’च्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या घेतल्या. सर्वांत मोठ्या प्रमाणावर झालेली या चाचणीचा निकाल फेब्रुवारीमध्ये मिळेल. त्याचबरोबर ‘नोव्होवॅक्स’च्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्याही सुरू आहेत. ‘आरबीडी’, ‘कोडोजेनिक्‍स’वरही सीरम काम करीत आहे. घोड्यापासून विकसित केलेल्या ऍन्टीसिरा लसीवरही संशोधन सुरू आहे. या पुढे जाऊन ‘सार्स कोव्ह’ कुटुंबातील, म्हणजे कोरोना कुटुंबातील सर्वच विषाणूंवर उपयोगी ठरेल अशा लसीवर सीरमने संशोधनाला सुरवात केली आहे.

भविष्यात अशा साथी येण्याची शक्‍यता आहे का? त्यादृष्टीने तुम्ही काय तयारी केली आहे? 
कोरोनासारखी वैश्‍विक साथ पूर्वी फार तर १०० किंवा ५० वर्षांतून अशी यायची, पण वाढते प्रदूषण आणि हवामान बदल पाहता भविष्यात अशा साथींची शक्‍यता अधिक असेल. त्यादृष्टीने आवश्‍यक पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच नवीनतम संशोधनालाही आम्ही प्राधान्य दिले आहे. एकावेळी कोट्यवधी डोस तयार करता येतील, अशा सुविधा सीरम उभारत असून, भविष्याची गरज बघता आम्ही यात वाढ करणार आहोत. एम-आरएनए किंवा प्रथिनांवर आधारित तंत्रज्ञानाचा आता लशींच्या निर्मितीसाठी वापर करण्यात येत आहे. सीरमही त्यासाठी आवश्‍यक सर्व प्रयत्न करत आहे.

आणखी वाचा:

देशहिताशी तडजोड अथवा भारताचे नुकसान कदापि सहन करणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथसिंह -

संबंधित बातम्या