अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेल्या 'जेईई मेन्स' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक सरकारने काल जाहीर केले.

नवी दिल्ली :  अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाची जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक सरकारने काल जाहीर केले. आता वर्षात चार वेळा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार असून पहिली परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या दरम्यान होईल. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मेमध्ये परीक्षा घेतली जाईल, अशी घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज केली. परीक्षा संपल्यानंतर पाच दिवसांच्या आत निकाल जाहीर केला जाईल. 

 

विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या या मुद्द्यावर आज शिक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. मंत्री निशंक म्हणाले, की ९० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचे प्रत्येकी २५ असे ७५ प्रश्न सोडविणे बंधनकारक असेल. या तिन्ही विषयांचे प्रत्येकी ३० - ३० प्रश्न असतील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा देता येणार असून गुणवाढीसाठी मदत मिळेल, असा दावाही निशंक यांनी केला. ते म्हणाले, की विद्यार्थ्यांसह विविध घटकांकडून आलेल्या सूचनांच्या आधारे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अशा चार सत्रांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय केला आहे.

 

अधिक वाचा :

बालसंगोपन केंद्रामधील बालकांना तीस दिवसांच्या आत  निधी द्या 

कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला

संबंधित बातम्या