परीक्षा रद्द होणार नाहीत; 1 जूनला होणार CBSE आणि ICSE बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा 

दैनिक गोमंतक
रविवार, 23 मे 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि  भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र (ICSE)च्या 12 वी बोर्डाच्या परिक्षा रद्द करणार नसल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंडळाने दिली आहे.

नवी दिल्ली :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि  भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र (ICSE)च्या 12 वी बोर्डाच्या परिक्षा रद्द करणार नसल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंडळाने दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.   या बैठकीत येत्या 1 जून रोजी 12 वी  बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती  मिळाली आहे.  याबाबत मिळालेल्या महितीनुसार 12 वी बोर्डाची परीक्षा रद्द रद्द होणार नसून ती जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही बोर्डाच्या परीक्षा जुलैमध्ये कोरोना प्रोटोकॉलनुसार घेण्यात आल्या होत्या. जुलैमध्ये होणाऱ्या या परीक्षा कधी,  केव्हा  आणि   कोणत्या स्वरूपात घेण्यात येतील याबाबत शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 1 जून रोजी माहिती देणार आहेत.   (Exams will not be canceled; Board exam dates to be announced on June 1) 

ऑगस्ट महिन्यापासून देशात सरु होणार स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन

दरम्यान दिल्ली सरकारला बोर्डाचा हा निर्णय मान्य नसल्याचे समोर आले आहे.  आज केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  दिल्ली सरकार कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यास अनुकूल नसून बोर्डाने दिलेले दोन्ही पर्याय  अनुरूप नाहीत. देश दुसऱ्या लाटेचा सामना करत असून आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, यात मुलांना सर्वाधिक धोका सांगितला आहे.  अशा परिस्थितीत आपण पालक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द केली पाहिजे, त्याचबरोबर बारावीच्या विद्यार्थ्यांना फक्त मागील रेकॉर्डच्या आधारे उत्तीर्ण केले जावे, अशी भूमिका मनीष सिसोदिया यांनी मांडली आहे.  

तरुणाच्या कानाखाली मारणाऱ्या 'कलेक्टरला मुख्यमंत्र्यांनी केलं निलंबित...

आज झालेल्या बैठकीतून एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोर्ड बोर्ड फक्त महत्त्वपूर्ण विषयांचीच  परीक्षा घेऊ शकते.  या योजनेनुसार परीक्षा कमी वेळात पूर्ण होतील आणि निकालही  वेळेत जाहीर करता येतील. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, व्यवसाय अभ्यास, लेखा, भूगोल, अर्थशास्त्र आणि इंग्रजी यांसारख्या विषयांचीच परीक्षा होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तथापि, छत्तीसगड बोर्डाने आज बारावी बोर्डाच्या  परीक्षांसाठी  एक विशेष पर्याय निवडला आहे. यानुसार, 1 जूनपासून विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर येऊन प्रश्नपत्रिका घेऊन जातील आणि 5 दिवसांच्या आत उत्तरपत्रिका जमा करतील. विशेष म्हणजे ही  परीक्षा फक्त घरूनच देता येणार आहे.  तर साथीच्या काळात परीक्षा आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. तसेच या संकटाच्या परिस्थितीत विद्यार्थी मानसिकदृष्ट्या परीक्षेसाठी तयार नसल्यामुळे  बऱ्याच दिवसांपासून  बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.  

संबंधित बातम्या