अमरेहा हत्याकांडामधील दोषी शबनमची फाशी काही काळ टळली

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

उत्तरप्रदेशातील अमरोहा हत्याकांडातील आरोपी शबनम हिला देण्यात येणाऱ्या फाशीवर काही काळ रोख लागला आहे.

अमरोहा : उत्तरप्रदेशातील अमरोहा हत्याकांडातील आरोपी शबनम हिला देण्यात येणाऱ्या फाशीवर काही काळ रोख लागला आहे. तिच्या वकिलांनी राज्यपालांकडे पाठवलेली दया याचिका तिची ढाल बनली आहे. या याचिकेच्या निस्तारणापूर्वी शबनमला फाशी देता येणार नाही. रामपूर जेल प्रशासनाकडून अमरोहा सेशन न्यायालयाकडे पाठवलेल्य़ा याचिकेच्या आधारावर मंगळवारी डेथ वॉरंट जारी केले नाही,न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला.

अमरोहा जिल्ह्य़ातील बावनखेडीमधील प्रियकर सलीमसोबत मिळून शबनमने 15 एप्रिल 2008 मध्ये वडिल, आई, भाऊ, वहिनी, बहीन, आणि भाचा यांची हत्या केली होती. 15 जुलै 2010 ला अमरोहा सेशन न्य़ायालयाने शबनम आणि तिचा प्रियकर सलीम यांना फाशीची शिक्षा दिली होती. त्यानंतर शबनमने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्य़ायालयाने सुध्दा तिची फाशीची शिक्षा कायम ठेवली. एवढच नाही तर राष्ट्रपतींनीही तिची दया याचिका फेटाळली. त्य़ानंतर या शबनम आणि सलिम दोघांनीही सर्वोच्च न्य़ायालय़ात पुन्हा एखदा याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने नंतरही याचिका रद्द करत रामपूर प्रशासनाला शबनम आणि सलिमला फाशी देण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनांतर रामपूर जेल प्रशासनाने अमरोहा सेशन न्यायालयाकडे डेथ वॉरंट काढण्यासाठी रिपोर्ट पाठवला. सेशन न्यायालयाने अभियोजन अधिकाऱ्याकडे शबनम प्रकरणाचा रिपोर्ट मागितला होता.

आंदोलक शेतकरी साजरा करणार 'दमन विरोधी दिवस' आणि 'पगडी संभाल दिवस...

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता राजीव जैन रामपूर कारागृहामध्ये पोहचले, आणि कारागृह अधिकाऱ्यांना  शबनमच्या द्वारा राज्यपालाकडे पाठवण्यात आलेल्य़ा दया याचिकेचे पत्र दिले. आणि त्य़ाची एक प्रत सेशन न्यायालयाकडे पाठवली. अधिवक्ता राजीव जैन यांनी फाशी रोखण्यासाठी दया याचिका राज्यपालांकडे पाठवली आहे. यात मुलगा ताजच्या संगोपनासाठी शबनमला दिलेल्या फाशीच्या शिक्षेत बदल करण्यात यावा आणि तिला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. यासाठी हरियाणामधील सोनिया कांडाचा दाखला जैन यांनी यावेळी दिला आहे.
 

संबंधित बातम्या