बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत
Exit polls for Bihar election shows majority for Tejaswi Yadav RJD

बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात यंदा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विजयाचा वारू महाआघाडीचे युवा नेते तेजस्वी यादव हे रोखण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात सत्तांतराचे संकेत मिळू लागले आहेत. राज्यातील अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर सायंकाळी विविध वृत्तवाहिन्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले. यातील बहुतांश वाहिन्यांनी महाआघाडीच्या विजयाचे भाकीत  वर्तविले आहे. नितीशकुमार यांनी सगळी राजकीय ताकद पणाला लावली असली तरीसुद्धा तेजस्वी यांची जनमानसातील क्रेझ वाढली असून इंडिया टुडे आणि ॲक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ४४ टक्के लोकांनी तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात असे म्हटले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com