वर्षभरानंतर उघडणार दिल्ली चे प्राणीसंग्रहालय; तिकिटांचे महागाले दर; असं कराव लागणार ऑनलाईन बूकिंग

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 मार्च 2021

जवळजवळ एक वर्षापासून बंद असलेलं दिल्लीचं प्राणीसंग्रहालय उघडणार हे ऐकून  लोक आनंदी झाले आहेत. १ एप्रिलला हे प्राणीसंग्रहालय उघडणार आहे,

दिल्ली: जवळजवळ एक वर्षापासून बंद असलेलं दिल्लीचं प्राणीसंग्रहालय उघडणार हे ऐकून  लोक आनंदी झाले आहेत. 1 एप्रिलला हे प्राणीसंग्रहालय उघडणार आहे, परंतु पुन्हा एकदा वाढत्या कोरोना संसर्गामुळे साशंकता व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात गेल्या आठवड्यात प्राणीसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठकही घेण्यात आली. त्यामध्ये नवीन फॉर्म आणि नियमांनुसार प्राणीसंग्रहालय उघडण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर वन्यजीवप्रेमी पुन्हा एकदा येथे भेट देऊ शकतात. मात्र आता तिकिटे पूर्वीपेक्षा थोडी महाग होऊ शकतात.

अलीकडे, बर्ड फ्लूमुळे प्राणीसंग्रहालयात प्रण्यांचे नमुने घेण्यात आले होते, जे नकारात्मक असल्याचे नोंदवले गेले होते. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्ंयाच्या म्हणण्यानुसार पूर्वी हे संग्रहालय कोरोनामुळे बंद होतं. नंतर बर्ड फ्लूच्या प्रकरणांमुळे ते उघडण्याची कल्पना कोल्ड स्टोरेजमध्ये गेली. जर पुढच्या महिन्यापर्यंत कोरोनाची प्रकरणे फारशी वाढली नाहीत तर प्राणीसंग्रहालय 100 टक्के  उघडण्याची चिन्हे आहेत.

प्राणीसंग्रहालय उघडल्यावर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. केवळ मर्यादित संख्येने पर्यटकांना या संग्रहालयात जाण्याची परवानगी असणार आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन तिकिटही बुक करावे लागतील. तिकिट बुकिंगनंतर पर्यटकांना मोबाइलवर दिलेल्या क्रमांकावरून प्रवेश मिळू शकेल. कोरोना साथीच्या काळात कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस असलेल्या तिकिटांना प्रोत्साहन देण्याचे उद्दीष्ट आहे.

होळी निमित्त घेवून येतोय Sakal Holi Beats 2k21 कार्यक्रमाची मेजवानी; पहा टिझर 

प्राणीसंग्रहालय उघडण्यापूर्वीच त्याची तिकिटेही महाग झाली आहेत. आता त्याची किंमत भारतीय प्रौढांसाठी 80 रुपयांवर केली गेली आहे.  पाच ते 12 वर्षांच्या मुलांसाठी 40 रुपये आहे. तर  पाच वर्षांखालील मुलांसाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे. 

अर्थ ऑवर डे 2021: आज या ऐतिहासिक इमारतींवरचेही लाइट बंद 

पूर्वी प्रौढांसाठी तिकिटांची किंमत 40 रुपये होती. परदेशी पर्यटकांच्या तिकिट दरात 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाच ते 12 वर्षे वयोगटातील परदेशी मुलांसाठी हे 200 रुपये आहे. सार्क देशांमधील प्रौढांसाठी हे 200 रुपये आणि मुलांसाठी 100 रुपये आहे.

संबंधित बातम्या