नायट्रोजनपासून ऑक्सिजन बनवण्याच्या वक्तव्यावरुन योगींनी दिलं स्पष्टीकरण..

The explanation given by the yogi from the statement of making oxygen from nitrogen
The explanation given by the yogi from the statement of making oxygen from nitrogen

देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पाश्वभूमीवर ऑक्सिजन Oxygen), बेड्स, औषधांचा तुटवडा भासत असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत राज्यात अशाप्रकारचा तुटवडा नसल्याचं भाष्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) यांनी केलं आहे. योगीनींच आयआयटी कानपूरमधील(IIT Kanpur) तज्ञांना नायट्रोजन प्लॅन्टमधून ऑक्सिजन तयार करण्यासंदर्भात तंत्रज्ञान आणि शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश दिले आहेत. सध्या उत्तरप्रदेश सरकार राज्यातील रुग्णालयांना 631 टन ऑक्सिजन पुरवठा करत आहे. उत्तरप्रदेशला ऑक्सिजनचा पुरवठा प्रामुख्याने गुजरातमधील जामनगर, पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, आणि ओदिशातील रुरकेला येथून ऑक्सिजन पुरवठा केला जातोय. (The explanation given by the yogi from the statement of making oxygen from nitrogen) 

‘’सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासंदर्भात आणि निर्मितीचे इतर मार्गही तपासून पाहिले पाहिजे असं येगींनी शनिवारच्या बैठकीमध्य़े म्हटले होते. आयआयटी कानपूरसंह इतर संस्थांमधील तज्ञांच्या संपर्कात राहण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्याचबरोबर नायट्रोजन प्लॅन्टमधून ऑक्सिजन बनवता येतो का हे तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सागिंतले होते,’’ अशी माहिती उत्तरप्रदेश सरकाराच्या प्रवक्त्यांनी माध्यमाला दिली होती.

झाशीमधील प्लॅन्टमधून ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मदत मिळाल्यांनतर राज्यातील साखर कारखाण्यामधून ऑक्सिजनची निर्मिती करता येईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. यासंबंधी तज्ञांशी संपर्क साधावा असं देखील योगींनी आधिकाऱ्यांना सांगितलं आहे. तसेच राज्यातील ज्या रुग्णालयांमध्ये  द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनचा मुबलक प्रमाणात साठा नाही त्या रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना योगींनी दिले आहेत.

मात्र दुसरीकडे नायट्रोजनपासून ऑक्सिजन निर्माण करण्यासंदर्भात शक्यता पडाताळून पाहण्याचे आदेश योगींनी दिल्याचं सागंण्यात आलं आणि एकच गोंधळ उडाला. नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन वेगवेगळे वायू असून एकातून दुसरा वायू बनवता येत नाही असं अनेकांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. योगींच्या नावाने चुकीचा अर्थ जाणारं वाक्य ट्विट केल्याने अनेकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे.

एकीकडे योगींना सोशल मिडियावर ट्रोल केलं जात असताना त्यांचे समर्थक आयआयटी मुंबईमध्ये नायट्रोजन निर्माण करणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्माण केला जात असल्याचा बातमीचा संदर्भ देताना दिसत आहे. मात्र त्यांनतर उत्तरप्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यमध्ये सुधारणा करत नायट्रोजनपासून ऑक्सिजन नाही तर नायट्रोजन ज्या ठिकाणी बनवला जातो त्या प्लॅन्टमधून ऑक्सिजन निर्माण करण्यासंदर्भातील चाचणीचे आदेश दिल्याचं बरोबर ट्विट केलं. या एका चुकीमुळे नेटकऱ्यांना मात्र मोठा मिळाला होता.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com