ऑक्सिजन सिलेंडर्सच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

ओबेरॉय हा ऑक्सिजन सिलेंडर्सचा काळाबाजार करत असल्याचं समजताचं त्याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन सिलेंडर्सचा (Oxgen Cylinders) काळाबाजार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज पंजाब बाग (Punjabi Bagh) परिसरातून दोघांना अटक केली आहे.  अटक केलेल्या आरोपींची नावं श्रेय ओबेरॉय, विकासपुरी आणि अभिषेक नंदा, शालिमार अशी या दोघांची नावं असल्याचं दिल्ली पोलिसांनी(Delhi Police) सांगितलं आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, ओबेरॉय हा ऑक्सिजन सिलेंडर्सचा काळाबाजार करत असल्याचं समजताचं त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.( Exposing the black market of oxygen cylinders)

पोलिसांनी अखेर छापा टाकून त्याला अटक केली. दरम्यान त्याच्याकडून दोन ऑक्सिजन सिलेंडर्स जप्त केले आहेत. ओबेरॉयने पोलिसांना सांगितलं की, हे दोन्ही सिलेंडर्स 37 हजार रुपयांना विकत घेतले असून हे सिलेंडर्स सोशल मिडियाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांना प्रत्येकी विकणार होता.

भारतात उपलब्ध असलेल्या कोरोना लसी; जाणून घ्या एका क्लीकवर

दिल्ली पोलिसांना चौकशी दरम्यान माहिती मिळाली की, ओबेरॉय हा ऑनलाईन खेळणी विकतो. त्याचा सहकारी अभिषेक नंदाकडून त्याने ऑक्सिजन सिलेंडर्स घेतले होते. यानंतर पोलिसांनी अभिषेकलाही अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून पाच ऑक्सिजन सिलेंडर्स आणि एक गाडी ताब्यात घेतली आहे.

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतच चालला आहे. लाखोंच्या संख्येने कोरोनाबाधित वाढत आहेत. तसेच रुग्णांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हीर आणि लसींचा तुटवडा भासू लागला आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांनाही अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे.

संबंधित बातम्या