दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन सादरीकरणाच्या अंतिम मुदतीत 30 जून पर्यंत वाढ 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBCE) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ते बोर्डाला सादर करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBCE) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ते बोर्डाला सादर करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.  दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकनाचे काम 11  जूनपर्यंत पूर्ण होईल आणि  20 जून पर्यंत निकाल जाहीर केले जातील, असे  मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र कोविड 19  (Covid 19) विषाणू संक्रमाणामुळे अनेक राज्यांतील लॉकडाऊनमुळे शिक्षक आणि कर्मचारी कर्मचार्‍यांची सुरक्षा  सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Extension of deadline for assessment of marks of 10th standard students till 30th June) 

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: ''लिव्ह-इन संबंध सामाजिक...

शिक्षकांच्या सुरक्षा आणि आरोग्यास प्राधान्य
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज  यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिक्षकांची  सुरक्षा आणि आरोग्यास सीबीएसई सर्वोच्च प्राधान्य देत आहे.  कोविड 19  विषाणू संक्रमणामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्गाची सुरक्षा पाहता मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ते बोर्डाला सादर करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

इस्रायल आणि गाझा हवाई हल्ल्यात घाबरलेल्या 'त्या' मुलीचा व्हिडिओ...

30 जूनपर्यंत हे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय गुणांचे मूल्यांकन मंडळाकडे सादर करायचे आहेत.  तर उर्वरित कामांसाठी, निकाल समित्या सीबीएसईने दिलेल्या योजनेच्या आधारे स्वतःचे वेळापत्रक तयार करू शकतात. दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीस सीबीएसईने दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या गुणांचे मूल्यांकन करण्याचे धोरण जाहीर केले होते. मात्र देशातील कोविड -19  विषाणूच्या प्रसारामुळे ते  रद्द करण्यात आल्या होत्या. 

या धोरणानुसार, दरवर्षी प्रमाणे, प्रत्येक विषयाचे  20 गुण अंतर्गत मूल्यांकनासाठी असतील, तर 80 गुणांचे मूल्यांकन वर्षभर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या चाचण्या आणि परीक्षांच्या आधारे केले जाईल. बोर्डाने शाळांना एक  निकाल समिती तयार करण्यास सांगितले होते. या समितीमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल निश्चित करण्यासाठी मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांचा समावेश असेल. शाळेतील पाच शिक्षक गणित, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि दोन भाषांचे  शिक्षक असावेत. तर शेजारील शाळेतील दोन शिक्षक समितीचे बाह्य सदस्य म्हणून निवडले जावेत, असेही या धोरणात नमूद करण्यात आले होते.

संबंधित बातम्या