विदेश मंत्री एस जयशंकर यांचा केजरीवालांवर निषाणा, बेजबाबदार वक्तव्याने होऊ शकतो द्विपक्षीय संबंधावर परिणाम

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

केजरीवाल हे भारताचे आवाज नाहीत, त्यांनी अशी बेजबाबदार वक्तव्ये करु नयेत ज्याचा परिणाम थेट द्विपक्षीय संबंधावर होऊ शकतो. 

नवी दिल्ली : देशाचे विदेश मंत्री (External Affairs Minister) एस जयशंकर (S.Jayshankar) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निषाणा साधला आहे. केजरीवाल हे भारताचे आवाज नाहीत, त्यांनी अशी बेजबाबदार वक्तव्ये करु नयेत ज्याचा परिणाम थेट द्विपक्षीय संबंधावर होऊ शकतो.(External Affairs Minister S Jaishankar targeting of Kejriwal irresponsible statement could affect bilateral relations) 

ते म्हणाले, सिंगापुर आणि भारत या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत. कोरोनाचे (Covid-19) युद्ध हे दोन्ही देश हातात हात घालून लढत आहेत. अशात काही लोक करत असलेल्या बेजबाबदार वक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंधामध्ये नुकसान पोहचू शकते. 

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापुरमध्ये घातक कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असून तेथील विमान सेवा तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती. याला देशाचे विदेश मंत्री एस जयशंकर यांनी आज उत्तर दिले आहे.  

संबंधित बातम्या