फेसबुकने 'किसान एकता मोर्चा'चे पेज अचानक बंद का केले?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 डिसेंबर 2020

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी फेसबुक वर 'किसान एकता मोर्चा' या संघटनेकडून एक पेज चालवण्यात येत आहे.  हे पेज फेसबुकवर अतिशय लोकप्रिय असून २० डिसेंबरला अचानकच या संघटनेचे फेसबुक पेज बंद करण्यात आले.

दिल्ली- कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी फेसबुक वर 'किसान एकता मोर्चा' या संघटनेकडून एक पेज चालवण्यात येत आहे.  हे पेज फेसबुकवर अतिशय लोकप्रिय असून २० डिसेंबरला अचानकच या संघटनेचे फेसबुक पेज बंद करण्यात आले. थोड्या वेळाने हे पेज पुन्हा सुरूही कऱण्यात आले. मात्र, फेसबुकच्या अशा कारवाईमुळे त्यावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहेत.

 काय आहे प्रकरण ?   
20 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शेतकरी आंदोलनाचे विश्लेषण कऱण्यासाठी प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव हे  लाईव्ह होते. मात्र, ते बोलत असताना अचानक हे पेजच बंद झाले. कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन करण्यात आल्याने आम्ही हे पेज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले. फेसबुककडून यावेळी स्पॅमचेही कारण देण्यात आले. म्हणजे हे पेज पुन्हा पुन्हा स्पॅम रिपोर्ट करण्यात आले असावे. यामुळेच फेसबुकने ते अनपब्लिश केले. मात्र,  हे पेज बंद करण्यामागील ठोस कारण फेसबुककडून अद्याप देण्यात आलेले नाही. वरून हे पेज बंद करण्याआधी फेसबुकने त्यांना तशी पूर्वसुचनाही केली नाही. 

 दोन तासानंतर पुन्हा सुरू करण्यात आले पेज

 घडलेल्या प्रकारानंतर जवळपास २ तासांनंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे पेज बंद झाल्यानंतर किसान एकता मोर्चाच्या आयटी सेलचे प्रमुख बलजीत सिंह यांनी इंस्टागॅमवर लाईव्ह येत म्हटले की, 'पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ क्लिप्स घेऊन त्यांच्यावर उत्तरे देण्यात आली होती.  पंतप्रधान मोदी लोकांशी शेतकरी आंदोलनासंदर्भात जे खोटं बोलत आहेत ते लोकांच्या पचनी पडत नसून म्हणूनच एवढ्या थंडीतही शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनासाठी बसले आहेत. आम्ही चार दिवसांपूर्वीच सुरू केलेल्या आमच्या फेसबूक पेजवर कारवाई करून आमच्या शांततेच्या मार्गाचा अपमान केला आहे. मात्र, आम्ही पुढेही शांततेच्या मार्गाने जाणार आहोत. फेसबुकने आम्ही कम्युनिटी गाइडलाईन्सचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. मात्र, आम्ही फेसबुकच्या गाइडलाइन्सचे उल्लंघन होईल असे काहीही पोस्ट केलेले नाही.     

संबंधित बातम्या