भाजपशासित राज्यात कोरोनाची खोटी आकडेवारी? स्मशानभूमीने सत्य आणलं समोर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

देशातील काही राज्य सरकारं कोरोना रुग्णांचे आकडे लपवत असल्याचे आरोप होता आहेत.  त्यातच मध्यप्रदेश मध्ये सुद्धा अशीच शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती पाहायला मिळते आहे.

देशात आलेल्या  दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे वाढत जाणारे आकडे भयावह ठरताना दिसत आहेत. त्यातच  देशातील काही राज्य सरकारं कोरोना रुग्णांचे आकडे लपवत असल्याचे आरोप होता आहेत.  त्यातच मध्यप्रदेश मध्ये सुद्धा अशीच शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती पाहायला मिळते आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची आरोग्य विभागाने सांगितलेली संख्या आणि स्मशानभूमीत जळणारे मृतदेह यात मोदी तफावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ( False statistics of corona in BJP ruled state Madhya Pradesh)

मध्यप्रदेशच्या (Madhyapradesh) भोपाळ शहरात मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू  झालेल्या ८४ लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर आरोग्य व्यवस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात कोरोनामुळे फक्त 40 मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर ठेवण्यात आली होती. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत असणारा हा फरक म्हणजे कोरोनाची सत्य परिस्थिती आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे वास्तव लपवण्याचा प्रयत्न मध्यप्रदेश सरकार (MP Government) करते आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. मध्य प्रदेश मध्ये बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार (Corona Statistics) एका आठवड्यात 6,477 घटना घडल्या असून 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 363,352 वर पोहोचली असून आता पर्यंत 4312 लोकांचे मृत्यू झाले आहेत.

निजामुद्दीन मरकजशी कुंभमेळ्याची तुलना करणं अयोग्य- तिरथसिंह रावत

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री प्रभुराम चौधरी (Prabhuram Choudhary) यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सदरील घटनेबद्दल आपल्याला माहिती मिळाली असून आपण त्या प्रकरणाची माहिती घेत आहोत, मात्र राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यू बद्दल कोणतीही माहिती लपवत नाही असे स्पष्ट केले आहे. 

संबंधित बातम्या