निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या प्रसिद्ध 'संदेश मिठाई'ला देखील चढला राजकिय रंग

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसातसा सगळ्या गोष्टींना राजकारणाचा रंग चढत आहे. कोलकाता येथील मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या हलवाई दुकानाने मतदानाच्या हंगामासाठी स्पेशल 'मतदार मिष्टी' तयार केली आहे. 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसातसा सगळ्या गोष्टींना राजकारणाचा रंग चढत आहे. तृणमूलचा लोगो असणारा क्रिकेटपटू मनोज तिवारीचं जॅकेट असो किंवा 'कमळ' असलेली अग्निमित्रा पॉल यांची डिझायनर साडी असो किंवा 'टुम्पा सोना', 'खेल होबे' यासारख्या आकर्षक गाण्यांची निर्मिती, सर्व काही राजकीय आहे. आता, हाच राजकिय रंग बंगालच्या प्रसिद्ध संदेश मिठाईमध्येसुद्धा उतरला आहे. कोलकाता येथील 'बलाराम मुलिक राधारमण मुलिक' नावाच्या शतकानुशतके मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या हलवाई दुकानाने मतदानाच्या हंगामासाठी स्पेशल 'मतदार मिष्टी' तयार केली आहे. मुख्य राजकिय पक्षांची चिन्हे कोरून बनवलेली संदेश मिठाई सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनत आहे. 

फारुक अब्दुलांचा व्हिडिओ होतोय व्हयरल; जाणून घ्या

डावी आघाडी, कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या चार प्रमुख पक्षांची चिन्हेच नव्हे तर जय श्रीराम आणि 'खेल होबे' हे नारेदेखील यावर कोरण्यात आले आहेत. सोशल मिडियावर ही मिठाई भलतीच ट्रेंड करत आहे. निवडणुका जवळ आल्या की मागणी वाढते. 'खेल होबे' आणि 'जय श्री राम' सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, असं या मिठाईच्या दुकानाचे मालक सुदीप मलिक म्हणाले. या मिठाईंनी सोशल मीडियावर बरेच लक्ष वेधले आहे. निवडणुका जवळ आल्या की अशा वस्तूंची मागणी वाढते असेही त्यांनी सांगितले. तथापि, दुकानात मिठाई खरेदी करण्यासाठी आलेले सर्व ग्राहक राजकीय मिठाई बघू शकतील.

18 वर्षे नव्हे तर मुलांचं पदवीपर्यंत करावे लागणार पालनपोषण: सर्वोच्च न्यायालय

या मार्केटींगच्या जगात राजकारणाची बाजारपेठ करण्यासाठीचा हा एक सुंदर मार्ग आहे, असे एका ग्राहकाने सांगितले. 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका नजीकच्या काळातल्या सर्वात जास्त चर्चील्या गेलेल्या निवडणुका ठरल्या. ज्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष प्रचाराच्या नवीन आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करत आहेत.

संबंधित बातम्या