वधू-वरांचा डान्स बघून या उद्योगपतीला आला राग

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

लग्नाच्या वेळी मजा करणे सामान्य आहे. लग्न म्हटलं की उत्साह, नाच, गाणे होतच असतात. वधू आणि वर देखील जोरदार नाचतांना आणि मजा करतांना दिसतात.

लग्नाच्या वेळी मजा करणे सामान्य आहे. लग्न म्हटलं की उत्साह, नाच, गाणे होतच असतात. वधू आणि वर देखील जोरदार नाचतांना आणि मजा करतांना दिसतात. पण असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वर-वधू सात फेरे  घेतांना नाचत आहेत. या व्हिडिओ मध्ये दोघेही हवन कुंडा भोवती नाचतांना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघेही प्रचंड ट्रोल झाले आहेत.

व्हिडिओमध्ये वधू-वर लग्नाच्या मंडपात लग्नाच्या वेळी नाचत आहेत. हे दोघेही 'आज मेरे यार की शादी है' या गाण्यावर नाचतांना दिसत आहेत. या गाण्यावर वर वधू दोघेही ठुमके मारतांना दिसत आहेत या दोघांनी केलेली गी मजा आजूबाजूच्या काही लोकांना पसंत आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोक आनंदी आहेत. पण सोशल मीडियावर ही स्टाईल लोकांना आवडली नाही. हा व्हायरल व्हिडिओ प्रसिद्ध उद्योजक वेदांत बिर्ला यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.  हे लग्न आहे की संस्काराची आहुती? हे विसरू नका की आपण जगात पूजनीय आहात, ते केवळ आपल्या संस्कृती आणि संस्कारामुळेच असे कॅप्शन बिर्ला यांनी या व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडिओ 5 लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये लोक या जोडप्यास टोकतांना दिसत आहेत आणि या दोघांना ट्रोल केले जात आहे.

फारुक अब्दुलांचा व्हिडिओ होतोय व्हयरल; जाणून घ्या 

 

संबंधित बातम्या