प्रसिद्ध पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे दुख:द  निधन

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

देशात सध्या कोरोनाचा विषाणू अनेक लोकांचा जीव घेत आहे

देशात सध्या कोरोनाचा विषाणू अनेक लोकांचा जीव घेत आहे. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस देशात वाढत असताना एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. रोहित सरदाना यांनी अनेक वर्ष चांगला पत्रकार म्हणून काम केले होते. रोहित सरदाना टीव्ही पत्रकारिता आणि अँकर क्षेत्रातील मोठे नाव होते. (Famous journalist and news anchor Rohit Sardana passed away)

वेगवेगळ्या वाहिन्यांवर त्यांनी अँकर म्हणून आपली भूमिका बजावली होती. त्यांची अँकरिंगची शैली अनेक लोकांनां आवडत असे ते नेत्यांना बोलते करण्यात पटाईत होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 'ताल ठोक के' या शो मधून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. कोरोनाच्या काळात ते अनेक लोकांना बेड्स, रेमडीसीव्हीर मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. 

संबंधित बातम्या