कृषी कायद्याने आधार कमकुवत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांमुळे देशाचा आधारच कमकुवत झाला असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पंतप्रधानांनी या कायद्यांबाबत फेरविचार करावा, असे आवाहनही राहुल यांनी केले.

रायपूर : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांमुळे देशाचा आधारच कमकुवत झाला असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पंतप्रधानांनी या कायद्यांबाबत फेरविचार करावा, असे आवाहनही राहुल यांनी केले. छत्तीसगड राज्याच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात राहुल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात उपस्थिततांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, कोरोना संसर्गामुळे देश अडचणीतून जात आहे. अशा परिस्थितीचा शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, महिला आणि युवक यांना अधिक फटका बसला आहे. देशात रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. आपण हे रोखायला हवे. शेतकरी आणि कामगार हे देशाचे आधार आहेत. ते कमजोर झाले तर देश कमजोर होईल. मात्र, नव्या कृषी कायद्यांमुळे या आधारावरच हल्ला झाला आहे. युवक आणि बालके हेदेखील देशाचे आधार आहेत. त्यांना संधी मिळणे आवश्‍यक आहे. मंडई, किमान आधारभूत किंमत आणि खरेदी प्रक्रिया यामध्ये काही कमतरता असेलही. मात्र, त्यात सुधारणा करण्याऐवजी संपूर्ण यंत्रणाच नष्ट केल्यास देशाचा आधार निखळून पडेल. म्हणूनच आम्ही कृषी कायद्यांना विरोध करत आहोत. पंतप्रधानांनीही या कायद्यांचा फेरविचार करावा. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, ते असे नक्की करतील, असा मला विश्‍वास आहे, असेही 
राहुल म्हणाले.

संबंधित बातम्या