शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला जाहीर इशारा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारने बनवलेल्य़ा कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने बनवलेल्य़ा कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटना आणि केंद्रसरकार यांच्य़ात कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र अद्याप तरी कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले पाहिजेत अशी मागणी शेतकरी संघटनांनकडून करण्यात येत आहे. सरकारकडून शेतकरी संघटनांना वेळोवेळी चर्चा करण्यासाठीची मागणी करत आहे. मात्र शेतकरी आंदोलनावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलच तापत आहे.

संसदेत विरोधी पक्षांनी मोदी सरकारला कृषी कायद्यावरुन घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी कृषी कायद्यावरुन केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ''केंद्र सरकारने जास्त डोकं खराब करु नये, सध्या तर देशाच्या जवान आणि शेतकऱ्यांनी कृषी कायदा परत घेण्याचा नारा दिला आहे. अजून सत्ता परत करण्याचा नारा दिलेला नाही.'' असं राकेश टिकैत म्हणाले. 

...वो डरे हैं, देश नहीं! राहुल गांधींनी धरले मोदी सरकारला धारेवर

त्य़ाचबरोबर ''लाल किल्ल्यावर झालेल्या हिसांचारावरुन केंद्र सरकारने फक्त द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. असा आरोप राकेश टिकैत यांनी केला. शेतकरी आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तसेच कृषी कायदे रद्द होइपर्यंत आम्ही कोणत्य़ाही परिस्थितीत मागे हटणार नाही.'' असं राकेश टिकैत यांनी कर्नालमध्ये भरलेल्या महापंचायतीत बोलताना सांगितले. देशात सुरु असणाऱ्य़ा शेतकरी आंदोलनाला देशातून तसेच परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. 

संबंधित बातम्या