सेलिब्रेटींच्या ट्विटर वॉरनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया
Farmer leader Rakesh Tikait reacts after celebrities Twitter war

सेलिब्रेटींच्या ट्विटर वॉरनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: गेल्या तीन  महिन्यांपासून  शेतकरी  कृषी  कायद्याच्या  विरोधात आंदोलन  करत  आहे. कृषी  कायद्यावरुन  शेतकरी  नेते  आणि  केंद्र  सरकारमध्ये अनेक  चर्चेच्या अनेक फेऱ्या  पार  पडल्या  मात्र  योग्य  तो  तोडगा  निघू  शकला  नाही. सध्या  देशात  कृषी कायद्यावरुन  राजकीय  वातावरण  चांगलच  तापलं  आहे. देशातून  तसेच  परदेशातून शेतकरी  आंदोलनाला  पाठिंबा  मिळत  आहे. रिहानाच्या  ट्वीटरनंतर  बॉलिवूड मधील सेलिब्रेटींनी केलेली ट्विट आणि त्यानंतर सुरु झालेले राजकीय युध्द यामुळे  गुरुवारी  शेतकरी  आंदोलनाच्या  चर्चेला  अजून  एखदा  उधान  आले.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी, ''आंतरराष्ट्रीय स्तरावरुन शेतकरी आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिब्यांच आम्ही स्वागत करतो. मात्र आपण या अंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींना आपण ओळखत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर आम्हाला अंतरराष्ट्रीय स्तरावरुन कोणी समर्थन देत असेल तर यामध्ये कोणती प्रकारची समस्या असणार नाही. आम्ही त्यांच्याकडून काही घेत नाही, आणि ते आम्हाला काही देत नाहीत.'' असं राकेश टिकैत म्हणाले. तसेच शेतकरी आंदोलनासंबंधी विरोधकांनी भेटण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता टिकैत म्हणाले. बॅरिकेड्सच्या एका बाजूला आम्ही बसलो आहोत तर बॅरिकेड्सच्या दुसऱ्या बाजूला ते बसले आहेत.

केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत आणि नवीन सुधारणा असणारे कृषी कायदे तयार करावेत, त्याचबरोबर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. केंद्र सरकारने कायदे करताना शेतकऱ्यांची मते जाणून घेतले पाहिजेत. मात्र केंद्र सरकारकडून या बनवलेल्या कृषी काय़द्यांचे समर्थन करण्यात येत आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहेत. शेतकऱ्य़ांना या कायद्यामुळे देशातील कोणत्याही ठिकाणी जावून आपला शेतीमाल विकता येणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र शेतकऱ्यांकडून या कायद्य़ांना मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे. या कायद्यामुळे बाजार काही मूठभर लोकांच्या हाती जाईल असा तर्क देण्यात येत आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com