'आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय घरवापसी नाही' शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

येत्या प्रजासत्तक दिनाच्या दिवशी राजपथावर होणाऱ्या संचालनालयाच्या वेळी तिंरगा घेवून ट्रक्टर मार्च काढणार आहे.जे लोक तिंरगा रैली रोखतील ते खरे खलिस्तानी असतीलं असं टिकैत यांनी सांगितलं.

मुंबई: केंद्रसरकारने मनमानीपणे पध्दतीने आणलेल्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.मात्र मोदीसरकारद्वारा संसदेत हे तीन कृषी कायदे रद्द केले जात नाहीत,तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आसल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी निर्धार बुधवारी मुबंईत व्यक्त केला.

मागण्या मान्य झाल्याशिवाय घरवापसी करणार नाही असंही म्हणत मोदीसरकारला इशारा दिला आहे.कायदे संसदेनं बनवले आहेत तर संसदच रद्द करेल सर्वोच्च न्यायालयाने कायदे बनवले नाहीत. 2024 पर्यंत आम्ही आंदोलनाची तयारी केली असल्याचं ही यावेळी टिकैत यांनी सांगितले.हे अंदोलन शेतकरी, कष्टकरी,छोटे व्यापारी यांचे आहे.

आंदोलन एक वैचारिक क्रांती आहे,ती विचारानेचं लढली जावी.त्या क्रांतीला सत्तेच्या मग्रुरमस्तीने दाबण्याचा प्रयत्न करु नका.ती केवळ नि केवळ विचारानेच शमवता येते असं म्हणत मोदी सरकारला टिकैत यांनी सुणावलं.पंतप्रधान मोदी खोटं कोणत्या कारणासाठी खोटं बोलत आहेत.त्यांच्यावर कोणत्या स्वरुपाचा दबाव आहे का?आम्हाला खोटं बोलतात ते शोधायचं आहे.

येत्या प्रजासत्तक दिनाच्या दिवशी राजपथावर होणाऱ्या संचालनालयाच्या वेळी तिंरगा घेवून ट्रक्टर मार्च काढणार आहे.जे लोक तिंरगा रैली रोखतील ते खरे खलिस्तानी असतीलं असं टिकैत यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या