कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

राजधानी दिल्लीच्या सीमांवर आज सलग १९ व्या दिवशी शेतकरी आंदोलनाची धग कायम होती.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या सीमांवर आज सलग १९ व्या दिवशी शेतकरी आंदोलनाची धग कायम होती. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी नेत्यांनी कायदा दुरुस्तीला पुन्हा स्पष्ट नकार दिला आहे.

किमान हमीभाव व बाजार समित्यांबद्दलच्या  दुरुस्त्यांबरोबरच आता शेतकऱ्यांसाठी पॅन कार्डची नोंदणी करण्याची नवी दुरुस्ती कायद्यांत करण्यासही केंद्राने तयारी दाखविली आहे.  केंद्र सरकारकडून शेतकरी नेत्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनात सहभागी झालेल्या गुरमित सिंग या मोहालीतील शेतकऱ्याचा आज दुपारी मृत्यू झाला. आंदोलन सुरू असताना प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. 

संबंधित बातम्या