''ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान घडलेल्या हिंसक घटनेशी आमचा संबंध नाही''  

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

केंद्राने केलेल्या नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी  दिल्लीत आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.

केंद्राने केलेल्या नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी  दिल्लीत आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर संयुक्त किसान संघटनेने या घटनेचा निषेध केला असून, काही भागात घडलेल्या हिंसक घटनांना विरोध दर्शवला आहे. 

Delhi Tractor Parade: कायदा व सुव्यवस्थेसाठी दिल्लीतील काही भागात इंटरनेट सेवा...

दिल्लीच्या सीमारेषेवर मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शेतकरी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यानंतर या शेतकऱ्यांनी आपला आवाज सरकारपर्यंत अधिक जोरकसपणे मांडण्यासाठी आज दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढली होती. मात्र या मोर्चाला दिल्लीतील नांगलोई, सिंघू, टिकारी बॉर्डर आणि अन्य काही भागात हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर हिंसक घडलेल्या घटनांचा व यासाठी जबाबदार असणाऱ्यांचा संयुक्त किसान संघटनेशी कोणताही संबंध नसल्याचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.       

दिल्लीतील काही भागात ट्रॅक्टर रॅलीच्या वेळेस घडलेल्या घटनांसंबंधी बोलताना या संघटनेच्या नेत्यांनी, आमच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता काही संघटना व व्यक्तींनी शांततेच्या मार्गाचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. व हे निंदनीय असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. तसेच शांततापूर्ण चळवळीत समाजकंटकांनी घुसखोरी केल्याचे या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे. याशिवाय, पहिल्या पासूनच आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे ठरवले असून, तीच आमची ताकद असल्याचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी नमूद केले. आणि कोणत्याही उल्लंघनामुळे चळवळीला नुकसान होऊ द्यायचे नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.    

 

संबंधित बातम्या