Farmer protest: गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकरी आक्रमक

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हर एक प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून  केले जात आहेत.

नवी दिल्ली: गेल्या तीन महिंन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने  बनवलेल्या कृषी  कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून अंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी काटेरी कुंपने उभी केली आहेत, रस्त्यावर खिळे रोवण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हर एक प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून  केले जात आहेत.

शेतकरी आंदोलनासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोदी सरकारने बनवलेल्या कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र अद्याप तरी कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. शेतकरी कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावेत या मागणी वर ठाम आहेत. दिल्ली पोलिसांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स, लोखंडी खांब, सींमावर लावलेल्या सीमेंटच्या भिंती शेतकऱ्यांना रोखण्यासाठी  दिल्ली पोलिसांनी उभ्या केल्या आहेत. मात्र आंदोलकांनी दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर  लावलेले खिळे काढण्यासाठी प्रयत्न करत आसलेले दिसून आले आहेत.गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी नाकाबंदी करण्य़ात आली आहे.

Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर अमेरिकेने दिला भारताला 'हा' सल्ला

बुधवारी  रस्त्यावर  लावलेले खिळे आंदोलक शेतकऱ्याकडून वाकवण्यात आले आसल्याचे  चित्र निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परदेशी सेलिब्रेटींनी पाठींबा दिला आहे. देशभरातील राजकीय नेत्यांनाही कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा अशा प्रकारच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आल्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ''कायदा हा प्रमुख आहे. केंद्रसरकार कृषी काय़द्य़ाच्या संदर्भात तसेच दिल्लीतील हिंसाचाराच्या योग्य ती कारवाई करेल अशी आम्हाला आशा आहे. असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.     

संबंधित बातम्या