Farmer Protest: "शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच पोलिसांचा बंदोबस्त"

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

दिल्ली पोलिस आंदोलक शेतकऱ्यांचा निषेध रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, काटेरी तार, स्पायक्स, लोखंडी खिळे, काँक्रीट बॅरिकेड्स, इंटरनेट बंदी अशा कितीतरी पर्यायांचा वापर दिल्ली पोलिस करत आहेत .

नवी दिल्ली: राजधानीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरूच आहे. निदर्शकांनी प्रामुख्याने गाझीपूर सीमेवर लक्ष केंद्रित केले आहे, परंतु सिंहू आणि टिक्री सीमेवरही मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित आहेत. दिल्ली पोलिस आंदोलक शेतकऱ्यांचा निषेध रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, काटेरी तार, स्पायक्स, लोखंडी खिळे, काँक्रीट बॅरिकेड्स, इंटरनेट बंदी अशा कितीतरी पर्यायांचा वापर दिल्ली पोलिस करत आहेत .

आंदोलन शांततामय असूनही, दिल्ली पोलिसांनी मार्ग बंद केला आहे. दिल्ली पोलिसांनी रस्ते बंद केले आहेत. हे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप  शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. 

"कानून वापसी नहीं तो घर वापसी नहीं"

दिल्लीच्या सीमेवरील बॅरिकेडिंगबाबत दिल्ली पोलिस आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे. “जेव्हा ट्रॅक्टर वापरण्यात आले तेव्हा पोलिसांवर हल्ला करण्यात आला, 26 तारखेला बॅरिकेड्स तोडण्यात कोणतीच अडचण उद्भवली नाही. आम्ही आता काय केले? आम्ही फक्त बॅरिकेडिंग मजबूत केले आहे जेणेकरून ते पुन्हा तुटू नयेत.”  

गाझीपूर सीमेवर आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांनी मंगळवारी एक विधान केले ज्यामुळे सरकारची चिंता वाढू शकते. "कानून वापसी नही तो घर वापसी नही" असे ते बोलले. मंगळवारी दुपारी शिवसेनेचे नेते मुंबईत टिकैत यांची भेट घेण्यासाठी गेले होते. पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत गाझीपूर सीमेवर पोहोचले. धरणे आंदोलनाच्या  सभोवताल कित्येक थर बॅरिकेडिंग, वर काटेरी तार ठेवली गेली आहे. रोडवर टायर किलर बसविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पोलिस आणि निमलष्करी दले मोठ्या संख्येने तैनात आहेत. टिकैट म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी दिल्ली पोलिस हे करत आहेत.

बंगालच्या निवडणुकीची चिंता दूर सारत ममता दीदींनी धरला पारंपरिक नृत्याचा ठेका -

दरम्यान राकेश टिकैत यांनी आज मंगळवारी पोलिसांनी लावलेली बॅरिकेडजवळ दुपारचे जेवण केले . राकेश टिकैत यावेळी म्हणाले की, "आम्ही कायद्याचा आदर करतो, हा लढा जोपर्यंत कायदा मागे घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील."  दिल्ली पोलिसांनी गाझीपूर सीमेवर अभूतपूर्व नाकाबंदी केली आहे. पिकेट साइट उड्डाणपुलाच्या चारही लेनवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. दिल्ली ते गाझियाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर 6 थरांचे बॅरिकेड लावले  गेले आहे. पहिल्या आणि दुसर्‍या थरात लोखंडी बॅरिकेड्स आणि त्यावर काटेरी तार आहे. तिसर्‍या थरात, कॉक्रीटचे 2 स्लॅब समोरासमोर उभे केले आहेत आणि त्यासोबतच मध्यभागी सिमेंटमध्ये सुमारे 2 फूट उंचीपर्यंत लोखंडी खिळे रोवले आहे. टिकारी सीमेवरही सातत्याने हेच काम सुरू आहे, टिकारी सीमेवर तटबंदी केली जात आहे. जेसीबीने रस्त्यावर मोठे सिमेंटचे खड्डे खोदले आहे.  

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येधे क्लिक करा

 

संबंधित बातम्या