Farmer Protest: जागतिक सेलिब्रिटिंकडून समर्थन; तर कंगनाने मुरडले नाक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

"कोणीही या आंदोलनाबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत ते असे दहशतवादी आहेत जे भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेणेकरुन चीन आपल्या असुरक्षित तुटलेल्या देशाचा ताबा घेवू शकेल

नवी दिल्ली : राजधानीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरूच आहे.  दिल्ली सिमेवरील आंदोलन गुंडाळले जावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असतांना आपल्याला दिसत आहे.  गेल्या 69 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांनी आपला निर्धार सोडला नाही. ऊन, वारा पाऊस,थंडी अशा कशाचाही विचार न करता शेतकरी आपले आंदोलन पुढे नेत आहे. दिल्ली पोलिस आंदोलक शेतकऱ्यांचा निषेध रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, काटेरी तार, स्पायक्स, लोखंडी खिळे, काँक्रीट बॅरिकेड्स, इंटरनेट बंदी अशा कितीतरी पर्यायांचा वापर दिल्ली पोलिस करत आहेत. मात्र जागतिक स्तरावरुन या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर  मोदी सरकारवर निशाणाही साधण्यात येत आहे. मात्र भारतातील कलाकार खेळाडू याबाबत गप्प बसले आहे. भारतातील सेलिब्रिटी कोणतीच भुमि का घेत नसतांना जागतिक पातळीवरुन मात्र दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. 

कॅण्डीडा ऑरिसची साथ ठरू शकते कोरोनापक्षाही भयंकर -

जागतीक स्तरावरची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने भारतातील दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा आहे असे जाहीर केले आहे. “भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.” असे ट्विट तिने काल मंगळवारी रात्री केले आहे. 

यापूर्वी सुप्रसिद्ध जागतिक पॉप आयकॉन सुपरस्टार रिहानाने देखील दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. सीएनएन या वृत्तसंस्थेची बातमी टाकून तिने ट्विट केले आहे. भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला दडपण्यासाठी इंटरनेट सुविधा बंद केली त्याचबरोबर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत माहिती देणारी ही बातमी होती. “आपण या शेतकरी आंदोलनाबाबत का बोलत नाही आहोत?" असा प्रश्न करून तिने ही बातमी शेअर करत ट्विट केले आहे.

तिने हे ट्विट केल्यानंतर तासाभरात व्हायरल झाले. ट्विटवर सोशल मिडियीवर  जोरदार चर्चाही सुरु झाली. काल रात्रीपासून तिचे हे ट्विट ट्रेंडीगमध्ये आले आहे. जगभरातून लोकांनी या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाची कट्टर समर्थक असलेली कंगना रनावतने आधीच शेतकरी आंदोलनावरुन तोंड वाकडे केले आहे. रिहानाने केलेल्या ट्विटवर कंगनाने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

अ‍ॅमेझॉनचे CEO जेफ बेझोस देणार पदाचा राजीनामा -

"कोणीही या आंदोलनाबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत ते असे दहशतवादी आहेत जे भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेणेकरुन चीन आपल्या असुरक्षित तुटलेल्या देशाचा ताबा घेवू शकेल आणि अमेरिकेप्रमाणेच चिनी वसाहत स्थापन करु शकेल. मुर्ख मुली तू गप्प बस, तुमच्या सारख्या बनावट लोकांप्रमाणे आम्ही आमचा देश विकायला काढला नाही अजून," असे ट्विट कंगनाने केले आहे.

 

संबंधित बातम्या