Farmer Protest: फेसबुक लाईव्ह करणं चूक होती; दीप सिधूने दिली कबुली

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 8 एप्रिल 2021

मी झेंडा फडकावला नाही आणि अन्य कोणाला फडकावण्यासाठी सांगितलंही नाही.

26 जानोवारी रोजी राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) लाल किल्ल्यावर एका विशिष्ट धर्माचा झेंडा फडकावल्याप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिंधू याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. गुरुवारी त्याच्या जामीन अर्जावर सुणावणी झाली. यावेळी त्याने आपल्या वकिलामार्फत किल्ल्यावर ध्वजारोहण करणं हा गुन्हा नाही, परंतु किल्ल्यावर फेसबुक लाईव्ह करुन चूक केली असल्याचं म्हटलं आहे.

न्यायालयामध्ये दिप सिंधूची (Deep Sidhu) बाजू अभिषेक गुप्ता यांनी मांडली. यावेळी दीप सिंधूवर लावलेले सगळे आरोप फेटाळून लावले. ‘’मी झेंडा फडकावला नाही आणि अन्य कोणाला फडकावण्यासाठी सांगितलंही नाही. ध्वजारोहण करणं हा काही गुन्हा नाही आणि मला त्यामध्ये पडायचंही नाही, हा चर्चेचा मुद्दा आहे. मी फेसबुक लाईव्ह करुन चूक केली मात्र मला फेसबुक लाईव्हसाठी देशद्रोही ठरवलं गेलं,’’ असं दिप सिंधूने आपल्या वकिलामार्फंत सांगितलं. 

पुढे बोलताना, निषेधाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे असं म्हणतं दिपचा दिल्लीतील हिंसाचारामध्ये सहभाग नव्हता किंवा हिंसा भडकावण्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत, असं गुप्ता म्हणाले. दीप लाल किल्यावर बऱ्याच उशिराने पोहचला होता, असंही गुप्ता यांनी सांगितलं. त्याचबरोबर दीपचा कोणत्याही शेतकरी संघटनेशी सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. ट्रक्टर रॅलीसाठी शेतकऱ्यांना उसकावलं नव्हतं. तसेच लाल किल्ल्याकडे जाण्यासाठी त्यांना सांगितलं नव्हतं, असा युक्तिवाद गुप्ता यांनी केला. (Farmer Protest It was wrong to make Facebook live Deep Sidhu confessed)

निवडणूक प्रचारात कोरोना नियमांचे उल्लंघन; न्यायालयाने सरकारला विचारला जाब

तर दुसरीकडे सरकारी वकिलांनी दिल्लीत झालेल्या हिसांचारामध्ये सहभागी नव्हता तर त्याने एक दिवस आगोदर सगळा कट रचला होता असा युक्तिवाद करत त्याच्या जामिनाला विरोध केला. दीप सिंधूने झेंडा फडकावण्यासाठी लाल किल्याजवळ जमा झालेल्या शेतकऱ्यांना उसकावलं. मूलभूत अधिकाराच्या नावाखाली हिंसाचार करण्यात आला. जे पोलिस कर्मचारी ड्यूटीवर होते त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही का, कामावर असताना त्यांच्यावर हल्ला झाला असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे. आता पुढे 12 एप्रिल रोजी दीप सिंधूच्या जामिन्यावर सुणवाणी होणार आहे.

दरम्यान तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या अंदोलनादरम्यान 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला होता.
 

संबंधित बातम्या