Farmer Protest: आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर बांधली कच्ची घरं

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

आंदोलक शेतकऱ्यांचा उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीनंतर कडकडीत उन्हाशी सामना होणार आहे.

नवी दिल्ली: कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात कृषी कायद्याच्या बाबतीत कोणत्याही स्वरुपाचा तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी चालवलेले आंदोलन काही संपायचं नाव घेत नाही. त्यातच आता आंदोलक शेतकऱ्यांचा उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीनंतर कडकडीत उन्हाशी सामना होणार आहे.

मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी निसर्गापुढे हार न मानण्याच्या तयारीनं आता कंबर कसली आहे. त्यामुळे उन्हाचा सामना करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवरेषेवरच विटांची कच्ची बांधकाम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कृषी कायदे रद्द करण्याच्या भूमिकेवर कायम राहून दिर्घकालीन संघर्षासाठी शेतकऱ्यांनी तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे.

दिल्ली सरकार ईव्ही चार्जिंग स्टेशन आखणीच्या तयारीत; जनतेला होणार असा काही फायदा

टिकरी सीमेवर आंदोलक शेतकरी बांधकाम करत असताना दिसत आहेत. टिकरी, बहादुरगड रोड या ठिकाणी शेतकरी कच्च्या घरांची बांधकामं करत आहेत. आतापर्यंत सीमेवर आंदोलन करत असताना शेतकऱ्य़ांचे ट्रक्टर, ट्रॉली, किंवा कापडी तंबू हा शेतकऱ्यांचा निवारा होता. परंतु शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांनी ट्रक्टर गावाला पाठवल्यामुळे कडकडीत उन्हासापून संरक्षण करण्यासाठी आता विटांची बांधकामं करायला सुरुवात केली आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात कृषी कायद्यावरुन 10 हून अधिक फेऱ्या झाल्यानंतर देखील तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलकांचे नेते राकेश टिकैत यांनीही केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.

 

संबंधित बातम्या