Farmer Protest: कृषी कायद्यांवरुन राज्यसभेत गदारोळ; विरोधी पक्षांनी केला सभात्याग 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

केंद्रकरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यावरुन राज्यसभेत विरोधी पक्षांनी हल्लाबोल  करत सभात्याग केला.

नवी दिल्ली: केंद्रकरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्य़ावरुन राज्यसभेत विरोधी पक्षांनी हल्लाबोल  करत सभात्याग केला. मंगळवारी राज्यसभेच्या  कामकाजाची सुरुवात झाली यावर कृषी कायद्यावर चर्चेची मागणी करत मोदी सरकारला घेरले. शेतकरी आंदोलनावर सभागृहात चर्चा करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, राजद, आणि डाव्या पक्षांनी केली होती. मात्र राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी चर्चेची मागणी अमान्य केली. उद्या राष्ट्रपती अभिभाषणावर मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाच्या  वेळी चर्चा करण्यात येणार त्य़ावेळी शेतकरी आंदोलनावर माननीय सदस्य आपले मुद्दे मांडू शकतात असे राज्यसभा  सभापती  व्यंकय्या नायडू यांनी सांगितले आहे.

Farmer Protest: "शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच पोलिसांचा बंदोबस्त"
राज्यसभा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर नायडू यांनी म्हटले की,'' सभागृहात शेतकरी आंदोलनावरुन चर्चा करण्यासाठी नियम क्रमांक 267 अतंर्गत विरोधी पक्षनेत्यांनी चर्चेची मागणी केली आहे. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. केंद्रसरकार आणि शेतकरी नेते यांच्य़ात कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या होत आहेत. असे यावेळी सभापती नायडू यांनी म्हटले ''.

Farmers Protest : "कानून वापसी नहीं तो घर वापसी नहीं" 

दरम्यान कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी, गेल्य़ा दोन महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी बसले आहेत. या मुद्दयावर सभागृहात चर्चा करणे आवश्यक आहे. तसेच तृणमूल कॉंग्रेस नेते सुखेंदू शेखर यांनी म्हटले की,'' केंद्रसरकार आणि शेतकरी नेते यांच्यात काय सुरु आहे सभागृहाला माहिती नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून  कडाक्याच्या थंडीत बसले आहेत. मात्र केंद्रसरकारला काहीही फरक पडत नाही. कृषी कायद्याला विरोध करत असताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

प्रजासत्ताक दिनी ट्रक्टर रॅली काढण्यात आली होती. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले. गाझीपूर बॉर्डरवर स्थानिक नागरिक आणि सीमेवर जमलेल्या शेतकरी यांच्यात ‘तिरंगे का अपमान नही सहेगा’ म्हणत स्थानिक नागरिकांनी शेतऱ्य़ांवर हल्ला केला होता.

संबंधित बातम्या