Farmer protest : ’आम्ही शेतीही करु आणि आंदोलनही सुरु ठेऊ’

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

दिल्लीच्य़ा सीमेवर कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी पीक पेरणी आणि शेतीच्या कामांसाठी परत जातील असा गैरसमज केंद्र सरकारने करुन घेऊ नये.

नवी दिल्ली: केंद्रसरकारने बनवलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्य़ा तीन महिन्यांपासून शेतकरी संघंटना दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी संघंटना यांच्य़ात कृषी कायद्यावर तोडगा काढण्य़ासाठी अनेक चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या मात्र यावर कोणत्याही स्वरुपाचा तोडगा निघू शकलेला नाही. मोदी सरकार जोपर्यंत कृषी कायदे रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं  शेतकरी संघंटनांनकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी हरियाणामधील खरक पुनियामध्ये भाषण देताना स्पष्ट केलं की,‘’सरकारने कृषी कायदे रद्द केल्य़ाशिवाय आम्ही मागे हटणार नाही. दिल्लीच्य़ा सीमेवर कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी पीक पेरणी आणि शेतीच्या कामांसाठी परत जातील असा गैरसमज केंद्र सरकारने करुन घेऊ नये. जर सरकारने आमच्यावर जबरदस्ती केल्यास आम्ही शेतातील पीकं जाळू मात्र आंदोलनातून कोणत्याही परिस्थीतीत मागे हटणार नाही. कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलन दोन महिन्यात संपेल असा समज सरकारने करु नये आम्ही शेतीही आणि आंदोलनही सुरु ठेऊ,’’ असं टिकैतांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी आज आसाममधील महाबाहू-ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचे उद्घाटन करणार

राकेश टिकैत यांनी यापूर्वीही केंद्र सरकारला जास्त डोकं खराब करु नका असं म्हणत इशाराही दिला होता.‘’सध्या फक्त जवान आणि शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा नारा दिला आहे, मात्र सत्ता परत करण्याचा नारा दिलेला नाही,'' असं टिकैत यांनी म्हटले होते. दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असणारे आंदोलन हे हक्कांसाठी सुरु आहे, सरकारने मागण्या मान्य केल्या तर शेतकरी आंदोलन थांबवेल नाहीतर हे आंदोलन सुरुच राहणार,’’ असही त्य़ांनी म्हटले होते.    

संबंधित बातम्या