Farmer Protest: देशभरात ताकदीच्या बळावर नव्हे तर, शांततेच्या मार्गाने विरोध करु

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 मे 2021

शेतकरी अंदोलनाला तब्बल सहा महिने पूर्ण होत असल्याने हे राष्ट्रीय अंदोलन होणार आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) वाढत असतानाही कृषी कायद्या विरोधातील शेतकरी अंदोलन (Farmer Protest) अजूनही सुरुच आहे. शेतकऱ्यांचे अनेक गट हरियाणा आणि पंजाबमधून दिल्लीकडे (Delhi) कूच करत आहेत. आणि याचं कारण म्हणजे येत्या 26 मे ला होणारं राष्ट्रीय अंदोलन. शेतकरी अंदोलनाला तब्बल सहा महिने पूर्ण होत असल्याने हे राष्ट्रीय अंदोलन होणार आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, त्यांना या राष्ट्रीय अंदोलनामधून ताकद दाखवायची नाही. तर देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे एक प्रतिकात्मक अंदोलन असणार आहे. (Farmer Protest If we dont have the strength we will oppose We will hold a national movement)

संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आणि पंजाबच्या क्रांतीकारी किसान संघटनेचे प्रमुख डॉ. दर्शन पाल (Darshan Pal) म्हणाले, आम्ही गावात, शहरात आणि दिल्लीच्या सीमांवरही हे अंदोलन करणार आहोत. मात्र या आंदोलनातून आम्ही आमची ताकद दाखवणार नसून आमचा निषेध दर्शवणार आहोत. आम्ही काळ्या पगड्या, दुपट्टे किंवा काळी कपडे परिधान करणार आहोत. तसेच गावागावामध्ये मोदी सरकारचे प्रतिकात्मक पुतळे जाळणार आहोत. सुरक्षित अतंर आणि कोरोना नियमांचे पालन करुन आम्ही राष्ट्रीय अंदोलन करणार आहोत.

केंद्र सरकार फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर कारवाईच्या तयारीत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान असा जमाव करण्याची गरज आहे का याबद्दल विचारलं असता पाल म्हणाले, मोदी सरकार आमच्या दुर्देशेची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. मात्र सरकार आमची प्रतिमा खलनायकासारखी तयार करत आहे. त्यांना त्यांचा कृषी कायद्यासंबंधीचा प्रस्ताव बदलण्याची गरज आहे. शेतकरी त्यांच्या योग्य मागण्यांसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत.

पंजाबमधील शेतकरी संघटनेचे सरचिटणीस सुखदेव सिंग कोकरीकलम सांगतात की, देशातील विविध गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शेतकरी अंदोलनाच्या भविष्याबद्दल चर्चा करणार आहोत. मात्र, शेतकरी कमी संख्येने का होईना, पण आंदोलन सुरु रहायला हवं या मागणीवर ठाम आहेत. ते पुढे म्हणतात, मोदी सरकार कोरोनाच्या संसर्गाचं कारण देत आमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही दिल्लीच्या सीमांवर कोरोना नियमाचं पालन करुन अंदोलन करत आहोत आणि आम्ही आंदोलनकर्त्यांची संख्याही कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन कमी केली आहे.
 

संबंधित बातम्या