‘किसान शक्ती’चे आज दिल्लीत प्रदर्शन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

कृषी कायद्यांना विरोधासाठी गेले दोन महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर शेतकरी संघटनांनी आजच्या मोर्चाची जोरदार तयारी केली आहे.

नवी दिल्ली :  कृषी कायद्यांना विरोधासाठी गेले दोन महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर शेतकरी संघटनांनी आजच्या मोर्चाची जोरदार तयारी केली आहे. तसेच, आता एक फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. तिरंगा फडकावत आज सकाळी 10 पासून निघणाऱ्या या रॅलीतील ट्रॅक्टरची संख्या 1 लाखांवर जाईल, असा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. आज राजपथावर एकीकडे प्रजासत्ताक दिनाचे संचलन होईल तर सीमेवरील रस्त्यांवर देशाची किसान शक्ती आपल्या निर्धाराचे प्रदर्शन करेल. 

संविधानातील मूल्यांचे निष्ठेने पालन व्हावे

प्रस्तावित ट्रॅक्‍टर मोर्चा शांततापूर्ण असेल, अशी हमी शेतकरी नेत्यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र पोलिसांकडून येणाऱ्या नवनवीन अटी आम्ही मान्य करणार नाही व दुपारी बाराला ट्रॅक्‍टर मोर्चा काढण्याची वेळही आम्हाला मंजूर नाही असे शेतकरी नेते सुखविंदरसिंग सभरा यांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी काल दुपारी शेतकरी नेते राकेश टिकैत, जगजीतसिंग डालोवाल व दर्शन पाल यांच्याशी पुन्हा चर्चा केली. पोलिसांनी 172 ते 174 किमीच्या मोर्चासाठी परवानगी दिली असली तरी शेतकऱ्यांनी 500 किलोमीटरचा मोर्चा निघणार असे म्हटले आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्याला निघून गेले म्हणत पवारांनी केली नाराजी व्यक्त

शेतकरी संघटनांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या ट्रॅक्‍टरचालकांची रीतसर नोंदणी केली आहे. त्यांच्या आधार कार्डांच्या प्रती जमा करण्यास सांगितले आहे. हिरव्या टी शर्टमधील चार प्रकारचे 3000 स्वयंसेवक मोर्चाच्या मार्गांवर ठिकठिकाणी तैनात केले जाणार आहेत. 

संबंधित बातम्या