Farmers Protest : संतप्त शेतकरी आंदोलकांचा भाजपा आमदारावर हल्ला 

दैनिक गोमंतक
रविवार, 28 मार्च 2021

पंजाबमधील शेतकरी आंदोलकांनी एका भाजपा आमदाराला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अरुण नारंग असे या भाजपा आमदारचे नाव आहे. 

पंजाब : केंद्रीय कृषि कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अनेकदा हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला, केंद्र सरकारशी कित्येकदा शेतकरी नेत्यांच्या बैठका झाल्या मात्र अद्यापही या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार कृषि कायदे मागे घ्यायला तयार नाहीत, तर शेतकरीही मागे हटायला तयार नाहीत. अनेकदा या आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहे. अशातच आता पुन्हा अशीच एक बातमी समोर आली आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलकांनी एका भाजपा आमदाराला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अरुण नारंग असे या भाजपा आमदारचे नाव आहे. 

आमदार अरुण नारंग यांनी मालोट रस्त्यावरील भाजपा कार्यालयात भाजपाच्या यशाबद्दल आणि पंजाबमधील कॅप्टन सरकारच्या चार वर्ष पूर्तीनिमित्त याशिवाय कॉंग्रेस सरकारच्या अपयशाबद्दल चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेची माहिती मिळताच पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांनी तिथे जात तहसील चौकात धरणे आंदोलन  सुरू केले. सायंकाळच्या वेळी जेव्हा अरुण नारंग त्यांचे सहकारी  राजेश पाठेला यांच्यासह तिथे पोहचले. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. पाहता पाहता आंदोलक शेतकरी अधिकच आक्रमक झाले. 

Corona Updtyanchyate : सावधान! देशात पुन्हा वाढतोय कोरोनाचा विळखा

यावेळी, नाराज शेतकऱ्यांनी तिथे त्यांच्यावर शाही फेकली. अरुण नारंग यांनी शेतकरी आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शेतकऱ्यांच्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलीसही असहाय्य दिसून आले. या निषेधाच्या वेळी आंदोलनकर्त्यांनी आमदाराच्या गाडीला काळा रंग फासला, सर्वत्र काळ्या तेलाने भाजपाबद्दल निंदनीय शब्द लिहिले. इतकेच नव्हे यावेळी  शेतकरी इतके आक्रमक झाले की, त्यांनी अरुण नारंग यांचे कपडे फाडले. त्यांच्या अपशब्द बोलत राहिले. त्यांनी भाजपा कार्यालयावरही हल्ला केला.  त्यानंतर कसेबसे पोलिसांनी अरुण नारंग यांचा बचाव करत एका सुरक्षित ठिकाणी नेत  त्यांचा बचाव केला. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच त्यांना कपडे घालण्यास दिले. 

तर दुसरीकडे, भाजपा मंडल मालोटचे कार्याध्यक्ष सीता राम खटक यांनी या घटनेचा निषेध केला आहे.  पोलिसांसमोरच अरुण नारंग यांच्यावर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी आंदोलकांवर हत्येच्या कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर संबंधित घेतणेची माहिती मिळताच  एसपी राजपालसिंग घटनास्थळी दाखल झाले. परंतु त्यांच्या आगमनापूर्वी डीएसपी जसपालसिंह, एसएचओ पोलिस स्टेशन हरजितसिंग मान, पोलिस स्टेशन सदरचे एसएचओ परमजीत सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस दल घटनास्थळी उपस्थित होते.

 

संबंधित बातम्या