Farmeres protest : शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्या; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मागणी!
Farmers protest Give corona vaccine to farmers Demand of farmer leader Rakesh Tikait

Farmeres protest : शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्या; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मागणी!

दिल्ली:(Farmers protest Give corona vaccine to farmers Demand of farmer leader Rakesh Tikait) गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र कोणत्याही स्वरुपाचा तोडगा निघू शकला नाही. आंदोलन स्थळावर कोरोनासंदर्भातील नियम, सोशल डिस्टन्सिंग, मास्क याविषय़ी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर थेट आंदोलक शेतकऱ्यांकडूनच एक मागणी करण्यात आली आहे.‘’आंदोलन स्थळावर असलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस देण्यात यावी’’ अशी मागणी शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश टिकैत यांनी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी आंदोलन करत असून कृषी कायदे रद्द करण्यासाठी मागणी करत आहेत.

किमान आधारभूत किंमत आणि इतर मुद्द्यांवर आंदोलक शेतकऱ्यांनी आपला विरोध सुरुच ठेवला आहे. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याच्या निर्णय़ावर शेतकरी ठाम आहेत.(Farmers protest Give corona vaccine to farmers Demand of farmer leader Rakesh Tikait)

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी अंदोलन पाठीमागे पडू शकते असं म्हटलं जात होतं. त्यामध्ये आंदोलकांचे काही गट परत देखील गेले. मात्र तरी देखील मोठ्यासंख्येने आंदोलक अजूनही दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून आंदोलक शेतकरी मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी असल्यामुळे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना कोरोनाची लस देण्याची मागणी केली आहे. ‘’कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे त्य़ासंदर्भात देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. जे लोक आंदोलनस्थळी बसले आहेत त्यांना देखील कोरोनाची लस देण्यात आली पाहिजे. मी स्वत:देखील कोरोनाची लस घेणार आहे. आंदोलनाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन आम्ही करत आहोत,’’ असं ते म्हणाले. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com